पोलीस आयुक्तांचं कुत्र हरवलं, अख्खं डिपार्टमेंटच लावलं कामाला
पोलीस आयुक्तांचं कुत्र हरवलं, अख्खं डिपार्टमेंटच लावलं कामाला Saam Tv
देश विदेश

पोलीस आयुक्तांचं कुत्र हरवलं, अख्खं डिपार्टमेंटच लावलं कामाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इस्लामाबाद - गुजराणवाला शहराचे आयुक्त झुल्फिकार घुमन यांनी कुत्रा बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदविली आणि पाकिस्‍तानात पोलीस प्रशासनाचे सर्वच अधिकारी एका कुत्र्याला शोधत व्यस्त झाले आहे. पोलीस अयुक्त झुल्फिकार घुमन यांचा कुत्रा काल बेपत्ता झाला. यानंतर आयुक्तांनी आपल्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी अख्या राज्याच्या यंत्रणेलाच कामाला लावले आहे.

हे देखील पहा -

आता पोलीस Police आणि महापालिकेचे अधिकारी ऑटो रिक्शावर लाउडस्पीकर Loudspeakerलावून कुत्रा बेपत्ता झाल्याची अनाउन्समेंट करत आहेत. आता घरो-घरी जाऊन त्या कुत्र्याचा शोध घातला जात आहे. इतकेच नव्हे, तर कुणाच्या घरी हा कुत्रा आढळल्यास कडक कारवाई देखील केली जाणार आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय कर्मचार्‍यांना ऑफिशिअल ड्युटी सोडून कुत्र्याला शोधण्याच्या कामात लावण्यात आले आहे.

कोणत्याही किंमतीत कुत्रा शोधण्याची जबाबदारी  गुजराणवाला  नगरपालिका व गुजराणवाला शहरातील स्थानिक पोलिसांवर आली आहे. बेपत्ता असलेल्या कुत्र्याची किंमत ही चार लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा कुत्रा कोणत्या जातीचा आहे याबाबद कोणतीही माहिती नाही. कुत्रा बेपत्ता झाल्यानंतर आयुक्तांच्या हाऊस केअरटेकर्सना त्याच्या दुर्लक्षामुळे फटकारण्यात आले आहे तर एका कर्मचाऱ्यालाही कामावरून काढण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अल्पवयीन मुलीचा खून करून मृतदेह टाकला विहिरीत , ग्रामस्थांचं मालेगाव-नामपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन

Coffee पिणं आरोग्यासाठी गुणकारी?

Mumbai News: PM मोदींचे शिवाजी पार्क परिसरातील कटआऊट्स हटवले, निवडणूक आयोगाची कारवाई

Pimpri-Chinchwad Hoarding Collapsed : पिंपरी-चिंचवड शहरात कोसळलं भलं मोठं होर्डिंग; दुचाकींसह वाहनं दबल्याची भीती, पाहा Video

Shahada News : शहाद्यात महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास

SCROLL FOR NEXT