संसदेत राडा; 10 खासदार निलंबित होणार?

पेगासस प्रकरणावरुन संसदेत आज प्रचंड गदारोळ झाल्याचे पहायला मिळाले.
संसदेत राडा; 10 खासदार निलंबित होणार?
संसदेत राडा; 10 खासदार निलंबित होणार?Saam Tv
Published On

नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी Rain अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांनी पेगॅसस Pegasus,महागाई आणि कृषी कायद्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. पेगासस प्रकरणावरुन संसदेत Parliament आज प्रचंड गदारोळ झाल्याचे पहायला मिळाले. विरोधकांनी पेगॅसस हे प्रकरण संसदेत दोन्ही सभागृहात लावून धरले होते. यादरम्यान काही सदस्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने काही दिशेने कागदपत्र फेकले यामुळे १० लोकसभा खासदारांवर निलबंनाची कारवाई Suspension action होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे देखील पहा -

राज्यसभेत बुधवारी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली त्यानंतर विरोधकांनी संसदेत हंगामा करायला सुरु केला यामुळे सभागृहाचे कामकाज आधी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. पण त्यानंतर कामकाज सुरु झाल्यानंतरही विरोधकांनी हंगामा कायम ठेवल्यामुळे २ वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले. कामकाज सुरु केल्यानंतर जुवेनाईल जस्टिस अमेंडमेंड बिल-२०२१ पास करण्यात आले.या पुर्ण आठवड्यात सभागृहाचे कामकाज केवळ ४ तास झाले आहे. आज विरोधकांनी कागदपत्रे फेकली असून जोरदार घोषणा दिल्या यामुळे या १० खासदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

संसदेत राडा; 10 खासदार निलंबित होणार?
नंदुरबार जिल्‍ह्यात पीककर्जाचे केवळ ३८ टक्केच वाटप

हे आहेत हे १० खासदार

रौनित बिट्टू

गुरजित औजला

टीएन प्रथपन

व्ही. वैथिलिंगम

सप्तगिरी शंकर

मणिकम टागोर

दिन कुरिकोसे

हेबी एडन

एस. ज्योतिमणी

दीपक बाज

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com