Doctor Assaults Patient At Igmc Shimla, Shocking Video Goes Viral 
देश विदेश

डॉक्टर की गुंड? उपचार घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून मारझोड, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Doctor Thrashes Patient in Shimla Medical College : शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एका डॉक्टरने उपचारादरम्यान रुग्णाला मारहाण केलीय. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर आणि रुग्णालयाच्या शिस्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत.

Bharat Jadhav

  • शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरकडून रुग्णावर मारहाण

  • उपचारासाठी दाखल रुग्णासोबत डॉक्टरांचे गैरवर्तन आणि हल्ला

  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल

शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये धक्कादायक घडलीय. एका रुग्णावर डॉक्टरनेच हल्ला केल्याची घटना घडलीय. आधी गैवर्तन करत डॉक्टरने रुग्णाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि सरकारने कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

वृत्तानुसार, रुग्णाचे नाव अर्जुन पनवार आहे, ते एंडोस्कोप करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यासाठी त्यांची तपासणी करण्यात आली त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तब्बल दोन तास वाट पाहण्यास सांगितलं. या दरम्यान त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे ते दुसऱ्या वॉर्डात गेले. तेथील बेडवर झोपले. या प्रकरणावरून डॉक्टरांनी त्यांना शिवीगाळ करत त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मारझोड करण्यास सुरुवात केली.

या घटनेनंतर रुग्णालयाच्या परिसरात मोठी गर्दी जमली. रुग्णसेविका आणि स्थानिक रहिवाशांनी आरोपी डॉक्टरवर कारवाई करण्याची आणि त्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केलीय. लोक म्हणाले की आयजीएमसीमध्ये डॉक्टरांच्या गैरवर्तनाच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. जखमी रुग्ण अर्जुन पनवार यांनी सांगितले की त्यांच्यावर विनाकारण मारहाण करण्यात आली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तात्काळ अहवाल मागवला आणि चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे.

आयजीएमसीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल राव यांनी सांगितले की, ही घटना दुपारी १२:३० ते १:०० च्या दरम्यान घडली. रुग्ण ओपीडीमध्ये होता त्याला बेड देण्यात आलेला नव्हता. प्राथमिक माहितीनुसार डॉक्टर आणि रुग्णामध्ये आजाराविषयी विचारपूस करण्यावरून वाद झाला, त्यानंतर हाणामारी झाली. दरम्यान डॉ. राहुल राव यांच्या मते, घटनेची माहिती मिळताच सरकारला कळवण्यात आले आहे. तपास अहवालाच्या आधारे सरकारने आरोपी डॉक्टरला पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi chi bhaji recipe: गावरान स्टाईल मेथीची सुकी भाजी कशी बनवायची?

IAS Officers Transferred: ऐन निवडणुकीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली?

Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

मुंबईत वंचित-काँग्रेस साथ साथ? आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती?

Maharashtra Live News Update: निलंगा नगरपालिकेत पराभव झालेल्या उमेदवारांने काढली, आभार रॅली, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT