DMK supports delimitation bill latest news  
देश विदेश

Delimitation Bill: मोठी बातमी! २२ खासदारांच्या पक्षाचा डिलिमिटेशनला पाठिंबा; संसदेतील राजकीय गणित बदलले

डिलिमिटेशन विधेयकावर डीएमकेने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. २२ खासदारांचे संख्याबळ असलेल्या डीएमकेच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत राजकीय मतभेद निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Namdeo Kumbhar

DMK supports delimitation bill latest news : केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाला द्रमुक (DMK) पक्षाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई येथे पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत या संदर्भात अधिकृत भूमिका निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. डीएमकेचे २२ खासदार आहेत. हे २२ खासदार सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेल्याने आता संख्याबळ वाढले आहे.

डिलिमिटेशन विधेयकावरून देशभरातील विरोधी पक्षांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. काँग्रेसने या विधेयकाला विरोध दर्शवत मित्रपक्षांनी वेगळी भूमिका घेऊ नये, असे संकेत दिले होते. मात्र, इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या डीएमकेने चेन्नईतील बैठकीत विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रीय राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

डीएमकेच्या या निर्णयामुळे संसदेतील आगामी रणनीती आणि विरोधी पक्षांच्या आघाडीतील समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आम्ही या सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहोत... भाजपच्या डिलिमिटेशन विधेयकामागील खरा उद्देश आता प्रत्येकाला समजला आहे. त्यांनी आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये काय केले, हे देशातील प्रत्येकाला माहीत आहे. मतदारसंघांची ही सोयीस्कर फेररचना (जेरीमँडरिंग) करून देशाला विभागणे हाच त्यांचा मुख्य अजेंडा आहे, हे सर्वांनाच माहिती आहे.
— के. सी. वेणुगोपाल, सरचिटणीस, काँग्रेस (AICC)

डिलिमिटेशन विधेयकावर बोलताना मनिथनेया मक्कल कच्ची (MMK) पक्षाचे अध्यक्ष एम. एच. जवाहिरुल्ला म्हणाले, "भाजप संविधानात जी कोणतीही दुरुस्ती आणते, तिच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे लागते. ती निश्चितच देशाच्या हिताची नसते. मात्र, सध्याची परिस्थिती अशी आहे की आपण २०२७ मध्ये गेलो, तर सत्ताधारी भाजप आपल्या लहरीनुसार आणि मर्जीनुसार कोणताही निर्णय घेऊ शकेल. त्यामुळेच आम्ही चर्चा केली. त्यानंतर आम्ही, डीएमकेला पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी एम. के. स्टॅलिन यांच्याशी चर्चा केली."

ते पुढे म्हणाले, "डीएमकेने आम्हाला सांगितले की यामध्ये अनेक गोष्टी आहेत. आपण ही संधी सोडली, तर २०२७ मध्ये भाजप आपल्या मर्जीप्रमाणे हे डिलिमिटेशन करेल. परंतु, आपण आत्ता विधेयकाला पाठिंबा देणार असू, तर हा पाठिंबा अटींसह असेल. विशेषतः डिलिमिटेशन आयोगात त्या-त्या राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे आणखी दोन सदस्य असले पाहिजेत. तसेच, सध्या ज्या मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे, अशा मतदारसंघांचे विभाजन करून सोयीस्कर निवड (चेरी-पिकिंग) केली जाणार नाही, असे डीएमके प्रमुखांनी आम्हाला सांगितले. ते याकडे लक्ष देतील, असे त्यांनी म्हटले आहे. विधानसभेत सादर करण्यात आलेल्या जोसेफ कुरियन समितीच्या अहवालात जे काही म्हटले आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही आम्ही सांगितले आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Choudhary : मोठी बातमी! मंत्री अशोक चौधरींचा राजीनामा, का सोडलं प्राध्यापक पद?

महिलांसाठी खुशखबर! 'या' योजनेसाठी १४ कोटींचा निधी मंजूर; खात्यात ४ दिवसात ₹३००० येणार

Maharashtra News Live Update : डिलिमिटेशनवर छगन भुजबळांची सावध भूमिका; लोकसंख्येनुसार लोकप्रतिनिधित्व वाढायला हवं

Delimitation Bill : ‘शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी माती खाल्ली’; संजय राऊत राष्ट्रवादीच्या खासदारांवर कडाडले, भाजपवरही निशाणा

Bhendi Bazaar : भेंडीच्या भाजीवरून पडलंय का मुंबईतील 'भेंडी बाजाराचं' नाव? उत्तर वाचून धक्काच बसेल

SCROLL FOR NEXT