Vijay TVK MLA News Vijay TVK
देश विदेश

मोठी बातमी! १०७ आमदारांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, देशाच्या राजकारणात खळबळ, नेमकं कारण काय?

Tamil Nadu Government Formation : तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा पेच अधिकच वाढला असून DMK आणि AIADMK एकत्र येण्याच्या चर्चेमुळे राजकारण तापले आहे.

Namdeo Kumbhar

Tamil Nadu Politics Latest News Update : तामिळनाडूच्या राजकारणातील सत्तास्थापनेचा पेच अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. DMK-AIADMK हे कट्टर विरोधक एकत्र येणार असल्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, अभिनेता विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने प्रस्थापित पक्षांना मोठा इशारा दिला आहे. जर डीएमके (DMK) आणि एआयडीएमके (AIADMK) या दोन कट्टर विरोधकांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. तर टीव्हीकेचे सर्व १०७ आमदार सामूहिक राजीनामा देतील, अशी भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तामिळनाडूच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना घडण्याची शक्यता आहे. कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे डीएमके आणि एआयडीएमके थलपती विजय यांना सत्तेपासून रोखण्यासाठी एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. एआयडीएमकेचे सरचिटणीस ई. के. पलानीस्वामी (EPS) आज राज्यपाल आर. व्ही. आर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी "आम्हाला पुन्हा निवडणुका नको आहेत" असे संकेत दिले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

प्रस्थापित पक्षांच्या या हालचालींविरुद्ध थलपती विजय यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या १०७ आमदारांचा राजीनामा देऊन ते पुन्हा जनतेच्या न्यायालयात जाण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.

थलपती विजय यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी एम. के. स्टॅलिन आणि ई. के. पलानीस्वामी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच विजय यांनीही आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतलाय. थलपती विजय यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे तामिळनाडूच्या प्रस्थापित राजकारणाला मोठे आव्हान मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन मोठे पक्ष आपली जुनी शत्रूत्व बाजूला सारून एकत्र येतात का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अटक, आज कोर्टात हजर करणार

Rain Alert : पुढील ३ दिवस महत्त्वाचे, राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Shocking: आई रागवल्याचा राग डोक्यात गेला, तरुणाने धरणात उडी मारत संपवलं आयुष्य

Friday Horoscope : 'या' ३ राशींना आज लागणार लॉटरी, नशिबाचे दार उघडणार; वाचा १२ राशींचे भविष्य

Friday Horoscope: या राशींच्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे, वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT