Cabinet Expansion Saam Tv
देश विदेश

Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, १९ नव्या मंत्र्यांनी घेतली शपथ, कुणाची लागली मंत्रिपदी वर्णी?

Karnatka Cabinet Expansion: कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला. १९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शेवटच्या क्षणी नावामध्ये अदलाबदल करण्यात आली. त्यामुळे अनेक आमदार नाराज झाले.

Priya More
  • डी. के. शिवकुमार सरकारने १९ नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला

  • विस्तारानंतर मंत्रिमंडळाची एकूण संख्या ३३ झाली

  • मंत्रिमंडळामध्ये आता एक जागा राहिली रिक्त

  • २२ वर्षांनंतर प्रथमच अनुसूचित जातीचे ७ आमदार मंत्रिमंडळात

कर्नाटकामध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. कर्नाटकच्या डी के शिवकुमार सरकारने सोमवारी आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार केला. काँग्रेसच्या १९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर दोन महिन्यांनी मुख्यमंत्री डी. के शिवकुमार यांनी सोमवारी १९ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करून घेतला. त्यामुळे मंत्रिमंडळाची एकूण संख्या ३३ झाली आहे. आता मंत्रिमंडळात एक जागा रिक्त राहिली असून त्या जागी कुणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे राहिल.

कर्नाटकच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडलं -

३३ सदस्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनुसूचित जातीचे ७ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे कर्नाटकच्या राजकारणात २२ वर्षांत पहिल्यांदाच घडले आहे. तसंच कर्नाटकच्या पुनर्रचनेनंतर पहिल्यांदाच ब्राह्मण समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधत्व मिळाले नाही. मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालेल्या नवीन सदस्यांमध्ये ८ आमदार पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. यामध्ये सिद्दरामय्या यांच्या मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांचा समावेश आहे. तरुण मंत्र्यांमध्ये रिझवान अर्शद आणि अजय धरम सिंग यांचा समावेश आहे. २०२४ मध्ये वाल्मिकी कॉर्पोरेशन घोटाळ्याप्रकरणी राजीनामा दिलेल्या बी. नागेंद्र यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी देण्यात आली आहे.

या ज्येष्ठ नेत्यांना डावललं -

तर डी. के शिवकुमार यांनी आपल्या मंत्रिमंडळात अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलले आहे. ज्यांना संधी मिळाली नाही त्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एचके पाटील, दिनेश गुंडू राव, लक्ष्मी हेब्बाळकर, शिवानंद पाटील, आरबी तिम्मापूर, आरव्ही देशपांडे, के व्यंकटेश आणि एचसी महादेवप्पा यांचा समावेश आहे.

या आमदाराची संधी हुकली -

तर अनेक नाट्यमय घडामोडीनंतर मंत्र्यांच्या २० नावांची प्राथमिक यादी जाहीर केल्यानंतर एका तासाच्या आतच हायकमांडने कोणतेही कारण न देता भटकळचे आमदार मानकल वैद्य यांच्या जागी दुसऱ्याला संधी दिली. त्यांच्या जागी दिवंगत ज्येष्ठ आमदार शमनूर शिवशंकरप्पा यांचे सुपुत्र आणि दावणगेरे उत्तरचे आमदार एस. एस. मल्लिकार्जुन यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली.

या १९ मंत्र्यांनी घेतली शपथ -

डी के शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालेल्या आणि ज्यांनी शपथ घेतली त्या मंत्र्यांमध्ये एन. चेलुवरायस्वामी, बसवराज रायरेड्डी, लक्ष्मण सावदी, मधु बंगारप्पा, एसएस मल्लिकार्जुन, बी नागेंद्र, एचसी बालकृष्ण, केएस बसवन्तप्पा, डॉ. अजय सिंह, पीएम नरेंद्रस्वामी, सी. पुत्तरंगा शेट्टी, टीआर रघुमूर्ति, रिजवान अरशद, शिवराज तंगडागी, रुद्रप्पा लमानी, बीजेड जमीर अहमद खान, संतोष लाड, केएम शिवलिंगे गौडा और विजयानंद कशप्पनवर यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकणात पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाचा येलो अलर्ट

Famous Filmmaker : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या आईचे निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

किडनी फेल होण्याचा सर्वाधिक धोका कुणाला असतो?

Live-in relationship: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; आता 'या' महत्त्वाच्या कायद्याचं संरक्षणही मिळणार

नीटनंतर आता E20 पेट्रोलवरून केंद्र सरकारविरोधात एल्गार, पंतप्रधान निवासस्थानावर मार्च

SCROLL FOR NEXT