Viral Video x
देश विदेश

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग; Video

Video : दिवाळीच्या सणामुळे अनेकजण गावी, घरी जाण्यासाठी निघाले. यामुळे गुजरातमधील एका रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तब्बल दीड ते दोन किलोमीटर लांब रांग लागल्याचे पाहायला मिळाले.

Yash Shirke

  • दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुरतच्या उधना स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग लागली.

  • गावी जाण्यासाठी हजारो प्रवासी स्टेशनबाहेर रांगेत उभे असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

  • प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला.

Viral Video : सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग असल्याची माहिती समोर आली आहे. दिवाळी सणामुळे घरी जाण्यासाठी उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी गर्दी केली. रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्रवशांची जवळपास दीड ते दोन किलोमीटर लांबीची रांग पाहायला मिळत आहे. यातील बहुतांश प्रवासी हे उत्तर प्रदेश, बिहार येथे गावी जाण्यासाठी निघाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी आणि छठपूजा याशिवाय बिहार विधानसभा निवडणुका असल्याने उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असल्याचे पाहायला मिळत आहे. सीट मिळवण्यासाठी श्रमिक वर्ग मध्यरात्रीपासून रांगेत उभे राहावे लागत आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्याने त्यांना प्लॅटफॉर्मवर जागा शोधण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे.

उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये असंख्य लोक कामाच्या निमित्ताने मुंबई, सुरतसारख्या महानगरामध्ये येत असतात. दिवाळी, छठपूजा अशा सणांच्या वेळी ते गावाला जायला निघतात. या नागरिकांसाठी भारतीय रेल्वेद्वारे अधिकच्या विशेष गाड्या चालवल्या जातात. दिवाळीचा सण लक्षात घेऊन सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवरुनही १२-१३ अतिरिक्त गाड्या चालवण्यात आल्या.

प्रवाशांच्या तुलनेमध्ये गाड्याची संख्या अपुऱ्या ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. गर्दी वाढत असल्याने प्रवाशांकडून आणखी अतिरिक्त ट्रेन्स चालवण्याची मागणी केली जात आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि व्यवस्था राखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने उधना रेल्वे स्टेशनवर खास पोलीस आणि आरपीएफचा चोख बंदोबस्त आहे. लांब रांगांमध्ये असलेल्या प्रवाशांना व्यवस्थितपणे ट्रेनमध्ये बसवण्याच्या कामात पोलीस गुंतले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT