Diwali News x
देश विदेश

बॉस असावा तर असा! दिवाळीची तब्बल ९ दिवसाची सुट्टी, घरी राहा आणि मज्जा करा; थेट CEO चा ईमेल

Diwali News : एका कंपनीच्या सीईओने कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ९ दिवसांची सुट्टी दिली. यासंबंधित ईमेल पाठवून सीईओने कर्मचाऱ्यांना सुखाचा धक्का दिला. या घटनेची मोठी चर्चा आहे.

Yash Shirke

  • एका पीआर फर्मच्या सीईओने कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी ९ दिवसांची सुट्टी दिली.

  • सर्व कर्मचाऱ्यांनी ही घोषणा सोशल मीडियावर आनंदाने शेअर केली.

  • ९ दिवसांची सुट्टी दिल्याने सीईओबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Diwali : एका पीआर फर्मने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी तब्बल नऊ दिवसांची सुट्टी दिली. नव्या उपक्रमाचा भाग म्हणून कंपनीचे संस्थापक आणि सीईओ यांनी दिवाळीच्या नऊ दिवसांच्या सुट्टीबद्दल माहिती देणारा ईमेल सर्वांना पाठवला. कामापासून दूर राहून कुटुंबीयांना वेळ द्या असे ईमेलमध्ये आवाहन करण्यात आले. या घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

एलिट मार्के या पीआर फर्मचे सीईओ रजत ग्रोव्हर यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीची नऊ दिवसांची सुट्टी असल्याचे सांगितले. त्यांनी सुट्टीचा आनंद घेण्याचे आणि कामापासून दूर राहण्याचे विनोदी पद्धतीने कर्मचाऱ्यांना आवाहन केले. ही आश्चर्यकारक भेट मिळाल्यानंतर एलिट मार्केमधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या.

पीआर फर्ममधील कर्मचाऱ्याने यावर लिंक्डइनवर पोस्ट लिहिली. 'लोक कामाचे ठिकाण आणि कामाच्या संस्कृतीबद्दल खूपकाही बोलत असतात. पण जे कर्मचाऱ्यांच्या गरजा ओळखतात, ज्यांना खरंच कर्मचाऱ्यांची काळजी असते त्यांच्या कृतीतून त्यांची काळजी दिसते. आनंदी कर्मचारी संघटनेच्या यशासाठी महत्वाचे असतात. अशा ठिकाणी काम करणे खास असते', असे कर्मचाऱ्याने पोस्टमध्ये लिहिले. त्याने सीईओ रजत ग्रोव्हर यांचे आभार देखील मानले.

सीईओद्वारे देणाऱ्या आलेल्या सुट्ट्यांमुळे एचआर टीमलाही आश्चर्य वाटले. सामान्यतः अशा प्रकारचे अपडेट्स एचआर टीममधील सदस्य पाठवत असतात. सीईओच्या घोषणेमुळे सर्वांनाच सुखद धक्का बसला. दिवाळीत तब्बल ९ सुट्टी देणारे सीईओ रजत ग्रोव्हर आणि त्यांची एलिट मार्के ही पीआर फर्म नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hairstyle Ideas: मकर संक्रांतीला काळ्या साडीवर खुलून दिसतील 'या' 5 हेअरस्टाईल्स; पारंपारिक लूकला मिळेल मॉडर्न टच

Deepika Padukone : चाहत्याच्या आईने पुरणपोळी आणली अन् दीपिकाने थेट...; VIDEO मधील साधेपणा पाहून नेटकरी भारावले

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपये पगार; पात्रता काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT