Diwali Bonus for Government Employee saam tv
देश विदेश

Diwali Bonus : दिवाळीच्या एक दिवस आधीच या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, ६० दिवसांचा बोनस जाहीर

Government Employee Diwali Bonus : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. दिवाळीच्या एक दिवस आधीच कर्मचाऱ्यांना ६० दिवसांचा बोनस जाहीर झाला आहे. त्यामुळं या कर्मचाऱ्यांना दिवाळी धुमधडाक्यात साजरी करता येणार आहे.

Saam Tv

  • केंद्र सरकारचं दिवाळी गिफ्ट

  • सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या एक दिवस आधीच खूशखबर

  • टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार ६० दिवसांचा बोनस

केंद्रातील मोदी सरकारनं दिवाळीच्या एक दिवस आधीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारच्या पोस्ट विभागानं याबाबत एक अधिकृत आदेश प्रसिद्ध केला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी उत्पादकता-लिंक्ड बोनसची घोषणा त्यात करण्यात आली आहे. त्यानुसार, टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांना ६० दिवसांच्या बोनस दिला जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचं फळ आणि सणासुदीच्या दिवसात त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं हे पाऊल उचललं आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस?

पोस्टाच्या आदेशानुसार, हा बोनस नियमित कर्मचारी - ग्रुप सी, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) आणि बिगर राजपत्रित ग्रुप बी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. ग्रामीण पोस्ट कर्मचारी जे नियमित कार्यरत आहेत, अशांना या बोनसचा लाभ मिळणार आहे. तसेच अस्थायी आणि कॅज्युअल कर्मचाऱ्यांनाही बोनस दिला जाणार आहे.

याशिवाय, जे कर्मचारी ३१ मार्च २०२५ नंतर सेवानिवृत्त किंवा राजीनामे दिले असतील, तसेच प्रतिनियुक्तीवर गेले असतील ते कर्मचारी देखील पात्र ठरणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकता-लिंक्ड बोनस, संबंधित तरतुदीनुसार लागू असेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बोनस कसा मिळेल?

पोस्टानं बोनस कोणत्या आधारे आणि कसा दिला जाईल याचा फॉर्म्युला स्पष्टपणे नमूद केला आहे. नियमित कर्मचाऱ्यांसाठी बोनस सरासरी वेतन X ६० दिवस ÷ ३०.४ अशा स्वरुपात दिला जाईल. बोनससाठी वेतनाची कमाल मर्यादा ७ हजार रुपये दरमहा निश्चित करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील टपाल कर्मचाऱ्यांसाठी (जीडीएस) बोनस त्यांच्या टाइम रिलेटेड कंटिन्युटी अलाउंस अर्थात टीआरसीए आणि महागाई भत्त्याच्या आधारे निश्चित केला जाईल. अस्थायी आणि पूर्णकालीन कॅज्युअल कर्मचाऱ्यांसाठी त्यांना १२०० रुपयांचा अनुमानित वेतनाच्या आधारे एड-हॉक बोनस दिला जाईल. नोकरी सोडणारे कर्मचारीही पात्र असतील. जे कर्मचारी ३१ मार्च २०२५ नंतर विभागातून सेवानिवृत्त, राजीनामे दिलेले किंवा प्रतिनियुक्तीवर असतील, त्यांनाही प्रो राटा आधारे बोनस देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Kitchen Hacks: कांद्यावर काळे डाग येऊ नये म्हणून करा हे सोपे उपाय

Famous Actress : मुलीसाठी बापाने हद्द पार केली; लोकप्रिय अभिनेत्रीचं केलं अपहरण, धमकी दिली अन्..., वाचा नेमकं प्रकरण

LIC Vima Sakhi : LIC ची जबरदस्त योजना! महिलांना दर महिन्याला मिळणार ₹७०००, अट फक्त १०वी पास

Weather Forecast: आजचे हवामान! ५ राज्यांना पावसाचा इशारा, तर १८ शहरावर दाट धुक्याचे सावट, महाराष्ट्रात काय स्थिती?

SCROLL FOR NEXT