Surabhi Jayashree Jagdish
कांदे साठवताना किंवा वापरताना त्यावर काळे डाग पडणं ही सामान्य समस्या आहे. हे डाग प्रामुख्याने ओलावा, बुरशी, चुकीची साठवणूक आणि जखमांमुळे पडतात. योग्य पद्धतीने हाताळणी आणि साठवण केल्यास कांदे जास्त काळ ताजे राहतात.
शेतातून किंवा बाजारातून आणलेले कांदे लगेच साठवू नयेत. हवेशीर ठिकाणी 2–3 दिवस वाळवून घ्यावेत. ओलावा राहिल्यास बुरशी वाढून काळे डाग पडतात.
छेद असलेल्या कांद्यांवर आधी काळे डाग पडतात. असे कांदे साठवणुकीत ठेवू नयेत, लगेच वापरावेत. खराब कांदा इतर कांदेही खराब करतो.
प्लास्टिक पिशवीत कांदे ठेवल्यास ओलावा तयार होतो. हवेशीर टोपली, बांबूची टोपली किंवा जाळी योग्य ठरते. हवा खेळती राहिल्याने बुरशीचा धोका कमी होतो.
जास्त उष्णता व सूर्यप्रकाश कांदे खराब करतो. स्वयंपाकघरात गॅसजवळ कांदे ठेवू नयेत. थंड व कोरडे ठिकाण कांद्यांसाठी उत्तम असते.
कांदे धुतल्यावर त्यावरील नैसर्गिक संरक्षण थर निघून जातो. धुतलेले कांदे लवकर सडतात व काळे डाग पडतात. फक्त वापरण्याआधीच कांदे धुवावेत.
साठवलेले कांदे एकाच स्थितीत ठेवू नयेत. आठवड्यातून एकदा उलथापालथ केल्यास ओलावा साचत नाही. खराब कांदे वेळीच काढून टाकता येतात.