Viral Chat Saam Tv
देश विदेश

Viral Chat: अरे बापरे! लग्नाच्या ४ वर्षांनंतर घटस्फोट, महिलेने लग्नाच्या फोटोग्राफरकडे पैसे परत मागितले, चॅट व्हायरल

लग्नाच्या चार वर्षांनी एका महिलेने तिच्या लग्नाच्या फोटोग्राफरशी संपर्क साधून विचित्र मागणी केली.

Shivani Tichkule

Viral Photographer and Women Chat: लोक त्यांच्या आयुष्यातील सुंदर क्षण फोटोच्या रूपात टिपण्यासाठी वेडिंग फोटोग्राफरची मदत घेतात. काम चांगले असेल तर फोटोग्राफरला पुन्हा बोलवतात. पण लग्नाच्या चार वर्षांनी एका महिलेने तिच्या लग्नाच्या फोटोग्राफरशी संपर्क साधून विचित्र मागणी केली. तिने या फोटोग्राफरला लग्नत काढलेल्या फोटोचे पैसे परत करण्याची मागणी केली आणि त्यामागचे कारण घटस्फोट आसल्याचे सांगितले. या दोघांमधील व्हॉट्सअ‍ॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. (Latest Marathi News)

सुरुवातीला त्या फोटोग्राफरला वाटले की कोणीतरी त्याच्यावर प्रँक करत आहे, परंतु नंतर समजले की ती महिलेला खरोखर पैसे मागत आहेत. फोटोग्राफरने पैसे परत करण्यास नकार दिला आणि दोघांमधील व्हॉट्सअ‍ॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले. त्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर लोक देखील आपल्या प्रतिक्रिया देत आहे. लान्स रोमियो फोटोग्राफर नावाच्या अकाऊंटवरून हे चॅट्स शेअर करण्यात आले आहेत. (Viral News)

महिला काय म्हणाली?

मेसेजमध्ये ती महिला म्हणते, 'तुला अजून मला ओळखतो की नाही हे मला माहीत नाही. 2019 मध्ये माझ्या लग्नात तुम्ही फोटोशूट (Photoshoot) केले होते. बरं, आता माझा घटस्फोट झाला आहे आणि आता त्या फोटोचे मला पैसे हवे आहे माझ्या माजी पतीला पैश्यांची गरज नाही. तू खूप छान काम केलेस, पण ती आता निरुपयोगी आहे कारण आमचा घटस्फोट झाला आहे. मला आम्ही दिलेले पैसे परत हवे आहेत कारण आता आम्हाला त्या फोटोंची गरज नाही.

यानंतर फोटोग्राफरने विचारले की तुम्ही मझयासोबत प्रँक करत आहात का? ज्यावर ती महिला नाही असे उत्तर देते. त्यानंतर छायाचित्रकार पैसे परत करण्यास नकार देतो. यानंतर महिलेने कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली, ज्यावर फोटोग्राफरने होकार दिला.

स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर महिलेच्या माजी पतीने फोटोग्राफरशी संपर्क साधला. तो म्हणला की मी तिच्या वतीने माफी मागतो. फोटोग्राफरच्या पोस्टवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

SCROLL FOR NEXT