Fuel trucks lined up at a depot as India increases diesel export duty, raising concerns over transport costs and inflation. saam tv
देश विदेश

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

Impact Of Diesel Export Duty Hike In India: इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिझेलवरील निर्यात शुल्कात मोठी वाढ केली आहे. या निर्णयाचा परिणाम मालवाहतूक, महागाई आणि सर्वसामान्यांच्या खर्चावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Omkar Sonawane

इराण इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महसूल वाढवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने हाय स्पीड डिझेलवरील विशेष उत्पादन शुल्क प्रति लिटर 24 रुपये पर्यंत वाढवले आहे. तर रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास प्रति लिटर 36 पर्यंत वाढवला आहे.

या निर्णयामुळे डिझेलवरील एकूण करात लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच डिझेलवरील निर्यात शुल्क 21.5 प्रति लिटरवरून 55.5 प्रति लिटरपर्यंत वाढवण्यात आले आहे. एव्हियशन टबाइन फ्युल वरील शुल्क देखील 29.5 प्रति लिटरवरून 42 प्रति लिटरपर्यंत वाढवण्यात आले आहे. मात्र पेट्रोलवरील निर्यात शुल्क शून्यच राहिले आहे.

अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू झाला आहे. वाढता आर्थिक दबाव आणि जागतिक घडामोडीमुळे महसूल वाढवण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे सरकारला वाटते. तज्ञांच्या मते या वाढीमुळे सरकारला अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतुकीचा खर्च वाढू शकतो. ज्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. ट्रक चालक, लॉजिस्टिक्स कंपन्या आणि शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसेल. मात्र, पेट्रोल पंपांवरील किरकोळ दरांमध्ये कोणताही बदल झाल्याचे वृत्त नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT