Air India Saam TV
देश विदेश

Air India ला मोठा दणका! ३० लाखांचा दंड, पायलटचा परवाना रद्द, काय आहे प्रकरण?

DGCA नागरी विमान वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय पायलटचा परवानाही तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे.

वृत्तसंस्था

Air India News : एअर इंडियाच्या विमानात लघुशंका केल्याप्रकरणी शुक्रवारी एअरलाइनवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. DGCA नागरी विमान वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय पायलटचा परवानाही तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. याशिवाय एअर इंडियाच्या उड्डाण सेवेतील संचालकाला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणारा आरोपी शंकर मिश्रा याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याला तब्बल ४२ दिवसांनी अटक केली. ही घटना २६ नोव्हेंबर २०२२ रोजी घडली होती. न्यूयॉर्कहून दिल्लीला (Delhi) येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा या प्रवाशाने वृद्ध महिलेच्या अंगावर लघुशंक केली होती.

यानंतर पीडित महिलेने दुसऱ्याच दिवशी विमान कंपनीकडे लेखी तक्रार केली होती. आरोपीवर कोणतीही कारवाई न झाल्याने महिलेने ४ जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली.

यानंतर दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्रा याला ६ जानेवारी रोजी बेंगळुरू येथून अटक केली. त्यानंतर मिश्राला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तर, एअर इंडियाकडून (Air India) मिश्रावर 30 दिवसांसाठी उड्डाण बंदी घातली होती.

या प्रकरणाने पेट घेतल्यानंतर आरोपी शंकरला त्याच्या कंपनीनं कामावरून काढून टाकलं होतं. शंकर मिश्रा हे वेल्स फार्गो कंपनीत उपाध्यक्ष होते. ही कंपनी अमेरिकेच्या बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा महामंडळाशी संबंधित आहे.

महिलेला 15 हजार रुपयांची भरपाई दिली होती

याआधी महिलेचे काही मेसेज शेअर करत शंकर मिश्रा याच्या वकिलांनी दावा केला होता की पीडितेने कथित कृत्य माफ केलं होतं आणि तक्रार नोंदवण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता. मिश्रा याच्या वकिलाने दावा केला की मिश्राने पीडितेला नुकसान भरपाई म्हणून 15,000 रुपये दिले होते, जे नंतर पीडितेच्या कुटुंबाने परत केले. त्याचवेळी, शंकर मिश्रा याच्या वडिलांनी शुक्रवारी दावा केला की त्यांच्या मुलावरील आरोप 'पूर्णपणे खोटे' आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

Vidhan Sabha Election Result : अकोल्यात बंडखोरीचा भाजपला फटका; काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी

SCROLL FOR NEXT