
Mumbai News: शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना कोणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षांच्या वकिलांंकडून याबद्दल जोरदार युक्तीवाद झाला. दोन्हीकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर यावर दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे आता ही सुनावणी ३० जानेवारी होणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. (Latest Marathi News)
गेल्या ६ महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना कोणाची? यावर सत्तासंघर्ष सुरु आहे. शिवसेना पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याचं काम सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे सोपावलं आहे. आज निवडणूक आयोगासमोर याबाबत महत्वाची सुनावणी पार पडली.
यावेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या वकीलांनी खरी शिवसेना आमचीच असा दावा निवडणूक आयोगासमोर केला. दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. लेखी उत्तरं मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार आहे.
वकिलांमध्येच शाब्दिक चकमक
आयोगासमोर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात शाब्दिक चकमक झाली. युक्तिवाद सुरू असताना कामत यांना महेश जेठमलानी यांनी प्रतिनिधी सभा केवळ तुमचीच कशी असू शकते? असा प्रश्न विचारला. यादरम्यान ठाकरे गटाचे वकील कामत आणि महेश जेठमलानी यांच्यात निवडणूक आयोगासमोरच वाद झाला.
कामत यांच्या प्रतिनिधी सभेच्या युक्तिवादावरुन महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. यानंतर निवडणूक आयुक्तांनी मध्यस्ती केली. ज्यानंतर वाद निवळला आणि पुन्हा सुणावनीला सुरूवात झाली आहे. दरम्यान, शिंदे गटाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य, प्रतिनिधी सभा ठाकरे गटाकडेच, मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही, असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.