Arvind Kejriwal On Delhi Confidence Motion Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal: बहुमत असतानाही अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत मांडला विश्वासदर्शक ठराव, जाणून घ्या काय आहे कारण?

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला.

Satish Kengar

Arvind Kejriwal On Delhi Confidence Motion:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. आम आदमी पक्षाकडे एकूण 70 जागांपैकी 62 आमदार असूनही केजरीवाल यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आहे.

आम आदमी पक्षाच्या एकाही आमदाराने पक्षांतर केलेला नाही, हे जनतेला दाखवून द्यायचे आहे, असे त्यांनी प्रस्ताव मांडताना सांगितले. सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. उद्या 17 फेब्रुवारीला विश्वासदर्शक ठरावावर चर्चा होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्ली विधानसभेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि म्हणजे की, "आम्ही पाहत आहोत की, पक्ष फोडले जात आहेत आणि खोटे गुन्हे दाखल करून इतर राज्यांमध्ये सरकार पाडले जात आहे. दिल्लीतील दारू धोरणाच्या नावाखाली आप पक्षातील नेत्यांना अटक करण्याची त्यांची योजना आहे.'' (Latest Marathi News)

भाजप दिल्लीत सरकार पाडू इच्छित आहे, कारण त्यांना माहित आहे, ते कधीही निवडणूक जिंकू शकत नाही, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. ते म्हणाले की, ''त्यांना (भाजप) दिल्लीचे सरकार पाडायचे आहे. कारण त्यांना माहित आहे की, ते दिल्लीत कधीही निवडणुका जिंकू शकत नाहीत. आमचा एकही आमदार फुटलेला नाही आणि ते सर्व शाबूत आहेत, हे जनतेला दाखवण्यासाठी मी विश्वासदर्शक ठराव मांडत आहे.''

दरम्यान, भाजपने आपच्या सात आमदारांना पक्ष बदलण्यासाठी २५ कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केला होता. दारू धोरण प्रकरणी लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी धमकीही भाजपने दिली होती, असं ते म्हणजे होते.

त्यांच्या दाव्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अरविंद केजरीवाल यांना आरोपांच्या तपासात सामील होण्यासाठी नोटीस पाठवली होती. पोलिसांनी त्यांना भाजपवर केलेले आरोप सिद्ध करण्यास सांगितले. नोटीसमध्ये, अरविंद केजरीवा यांना आम आदमी पक्षाच्या सात खासदारांची नावे उघड करण्यास सांगितले आहे. ज्यांच्याशी कथित संपर्क करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT