Tamil Nadu CM Vijay chairs all-party meeting as 19 MPs unite against delimitation proposal. saam tv
देश विदेश

डिलिमिटेशन विधेयकाला केंद्राची मंजुरी; लोकसभेच्या किती जागा वाढणार, कुणाचा पाठिंबा, कुणाचा विरोध, पुढे काय होणार?

Delimitation Bill 2026: मोदी सरकारचा मोठा निर्णय! केंद्रीय मंत्रिमंडळाने डिलिमिटेशन विधेयकाला मंजुरी दिली आहे. लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ झाल्यास महाराष्ट्रातील जागा ४८ वरून ७२ होऊ शकतात. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Namdeo Kumbhar

Cabinet approves Delimitation Bill : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिलिमिटेशन विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. आता हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडले जाणार आहे. जर हे विधेयक मंजूर झालं तर प्रत्येक राज्याच्या 50 % जागा वाढणार आहेत. तसेच लोकसभेच्या जागा 543 वरून 815 होणार आहेत.

डिलिमिटेशन विधेयकाला कॅबिनेट बैठकीत मंजूरी मिळाल्यानंतर सर्वांच्या नजरा हिवाळी अधिवेशनाकडे लागल्या आहेत. ३० नोव्हेंबरपासून हिवाळी अधिवेशन होणार आहे, त्यामध्ये डिलिमिटेशन विधेयक सादर केलं जाण्याची शक्यता आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंनारी शक्ती वंदन कायद्याशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकालाही मंजुरी दिली. यामध्ये सर्व राज्यांमध्ये समान प्रमाणात ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. ५० टक्के जागा वाढल्यास ही संख्या ७२ पर्यंत पोहोचू शकते. सर्व राज्यातील जागांच्या संख्येवरील ही मर्यादा २०५१ पर्यंत लागू राहणार आहे..

नेमक्या तरतुदी काय आहेत?

३० नोव्हेंबर रोजी लोकसभेचे आणि २ डिसेंबर रोजी राज्यसभेचे अधिवेशन सुरू होणार असून, या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विधेयकात जागांमध्ये ५० टक्के वाढीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेच्या जागांची संख्या ८५० होईल. त्यामध्ये राज्यांमध्ये ८१५ आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ३५ जागा असतील.

महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी मोदी सरकारला लोकसभेत दोन-तृतीयांश पाठिंब्याची आवश्यकता आहे. रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकारने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक या दोन्हीसाठी आवश्यक संख्याबळ मिळवले आहे.

संख्याबळाचं नेमकं गणित काय आहे?

डिलिमिटेशन विधेयकावर मतदान करण्यासाठी सभागृहात दोन-तृतीयांश बहुमताची गरज आहे. लोकसभेत सध्या ५४३ जागा आहेत. त्यापैकी ३ जागा रिक्त आहेत. म्हणजे सध्या ५४० खासदार आहेत. ५४० च्या दोन-तृतीयांश म्हणजे ३६० खासदारांचा पाठिंबा या विधेयकाला मंजूर कऱण्यासाठी लागतील. सध्या भाजप प्रणित एनडीएकडे ३२० खासदार आहेत.

भाजपा-241

एनसीपीआय-20

टीडीपी-16

शिवसेना-13

जेडीयू-12

इतर-18

वरील सर्व खासदारांची संख्या एकत्र केल्यास एनडीएचा आकडा ३२० वर पोहोचतो. सरकारला दोन-तृतीयांश जागांसाठी अजून ४० जागा कमी आहेत. आता त्या ४० खासदारांसाठी सर्वांचे लक्ष विरोधी पक्ष आणि इतर पक्षांवर लागले आहे. संसदेचे अधिवेशन अचानक बोलावल्यापासून विरोधी पक्षही केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. शशी थरूर आणि जयराम रमेश यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अधिवेशन अचानक बोलावल्याबद्दल सरकारवर टीका केली आहे.

दुसरीकडे इंडिया आघाडीतील दोन पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये डीएमके आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. डीएमकेच्या २ अटी सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे ते २२ खासदार पाठिंबा देतील असे बोलले जात आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्यामाहितीनुसार, पवारांचे ८ खासदारही या विधेयकाच्या बाजूने मतदान करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

28 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; गुन्हेगारांवर वचक बसणार? कोणाची कोणत्या जिल्ह्यात नियुक्ती?

Bike Maintenance: बाइक रोज चालवणं चांगलं की आठवड्यातून काही दिवस बंद ठेवणं?

Maharashtra News Live Update: अखेर अहिल्यानगर जिल्ह्यात ऊस दराचा तिढा सुटला

Latur : १७ गावांना पाणीपुरवठा करणारं धरण कोरडंठाक; पाणीटंचाईचं भीषण संकट; पाहा साम टीव्हीचा ग्राउंड रिपोर्ट

कातील नजर आणि घायाळ अंदा, प्रियदर्शनीचे नऊवारी साडीतील फोटो पाहून झोप उडेल

SCROLL FOR NEXT