Delhi Weather Saam Tv
देश विदेश

Delhi Weather: दिल्ली-एनसीआरमध्ये कडाक्याच्या थंडीत पावसाची हजेरी; IMD अलर्ट जारी!

दिल्लीतील बहुतांश भागात मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे. थंड वाऱ्यासह पावसामुळे किमान तापमानात घट झाली आहे. IMDने राजधानी आणि लगतच्या भागात आज दिवसभर मधूनमधून पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

वृत्तसंस्था

Delhi Weather Today: दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi NCR) हवामानाने पुन्हा एकदा बदल केला आहे. थंडीच्या लाटेनंतर आता पावसाने थंडी वाढवली आहे. आज शनिवारी सकाळपासून राजधानीत पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे तापमानात घट झाल्याने थंडी वाढली आहे. (Weather Update of Delhi)

शिवाय, मध्यरात्रीपासून राजधानीतील बहुतांश भागात पाऊस (Rain) सुरू आहे. थंड वाऱ्यासह पावसामुळे किमान तापमानात घट झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) राजधानी आणि लगतच्या भागात आज दिवसभर मधूनमधून पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागानुसार, दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात रिमझिम पाऊस पडेल आणि काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तीव्रतेच्या सरी पडतील. हलक्या ते मध्यम पावसाबाबत दिल्लीत यलो अलर्ट (Yellow Alert) आहे. अशा परिस्थितीत थंड वारे आणि पावसामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने ट्विटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, गाझियाबाद, इंद्रपुरम, नोएडा, दादरी, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद, मानेसर आणि वल्लभगडमध्ये पाऊस असणार आहे. (Delhi News)

IMD नुसार, आज ता. 22 जानेवारी रोजी देशाच्या उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच वेळी, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडसह देशातील इतर पर्वत असलेल्या काही भागातही बर्फवृष्टी (Snowfall) दिसून येईल. IMD नुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वातावरण ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Delhi Weather Update in Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT