Delhi Aap Leader Atishi indefinite hunger strike:  Saamtv
देश विदेश

Delhi Water Crisis: मोठी बातमी! पाणी प्रश्नासाठी उपोषणाला बसलेल्या 'आप' नेत्या आतिशी यांची प्रकृती खालावली; मध्यरात्री रुग्णालयात दाखल

Delhi Aap Leader Atishi indefinite hunger strike: राजधानी दिल्लीमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. हरियाणा सरकार दिल्लीच्या वाट्याचे पाणी देत ​​नसल्याचा आरोप केजरीवाल सरकारने केला आहे आणि त्याच विरोधात जलमंत्री आतिशी यांनी २१ जून पासून उपोषण सुरू केले आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. २५ जून २०२४

राजधानी दिल्लीच्या पाणीप्रश्नासाठी केजरीवाल सरकारमधील जलमंत्री आप नेत्या आतिशी यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा चौथा दिवस असून मध्यरात्री आतिशी यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राजधानी दिल्लीमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. हरियाणा सरकार दिल्लीच्या वाट्याचे पाणी देत ​​नसल्याचा आरोप केजरीवाल सरकारने केला आहे आणि त्याच विरोधात जलमंत्री आतिशी यांनी २१ जून पासून उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंत्री आतिशी यांची रक्तातील शुगर पातळी 36 वर घसरली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्रीपासून त्यांची रक्तातील साखरेची पातळी कमी होत होती. आम्ही जेव्हा त्याचे रक्ताचे नमुने घेतले तेव्हा त्याची साखरेची पातळी 46 असल्याचे समोर आले. जेव्हा आम्ही पोर्टेबल मशीनने शुगर पातळी तपासली तेव्हा साखरेची पातळी 36 असल्याचे समोर आले, अशी माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिली.

दरम्यान, 28 लाख दिल्लीकरांच्या हक्काचे पाणी देण्यासाठी बेमुदत उपोषणासाठी बसलेल्या जलमंत्री आतिशी यांनी हरियाणा सरकार जोपर्यंत दिल्लीकरांचे पाणी हक्क प्रदान करत नाही आणि हथनीकुंड बॅरेजचे दरवाजे उघडत नाही तोपर्यंत आपले बेमुदत उपोषण सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

SCROLL FOR NEXT