delhi ac blast news  Saam tv
देश विदेश

भल्या पहाटे गाढ झोपेत असताना एसीचा स्फोट, ४ फ्लॅट जळून खाक; ९ जणांचा होरपळून मृत्यू

delhi ac blast news : घरात एसीचा मोठा स्फोट होऊन 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना तातडीने रुग्णायात दाखल केले आहे.

Vishal Gangurde

दिल्लीत घडली मोठी दुर्घटना

दिल्लीतील इमारतीत आग लागून ९ जणांचा मृत्यू

दिल्लीतील घटनेने परिसरात खळबळ

दिल्लीच्या विवेक विहारामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. विवेक विहारमधील ४ मजली इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये रविवारी सकाळी एसीचा स्फोट होऊन आग लागली. क्षणभरात ही आग सर्वत्र पसरली. या घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्यची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे.

इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला इमारतीच्या एक प्लॅटला आग लागली. त्यानंतर आग इमारतीच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने प्रत्येक फ्लॅटमध्ये अडकलेल्या काही नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. इमारतीत अडकलेल्यांना घरातून बाहेर काढताना अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

घटना कशी घडली?

शाहदरा जिल्ह्यातील पोलीस आयुक्त राजेंद्र प्रसाद मीना यांनी सांगितलं की, 'विवेक विहारमधील ४ मजली इमारतीत आग लागण्याची घटना घडली. या इमारतीमधून ९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या कर्मचारी घटनास्थळी बचाव कार्यात सहभागी आहेत. या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे'.

स्थानिक रहिवासी रोहित यांनी सांगितलं की, 'एसीचा स्फोट होऊन आग लागली. आतापर्यंत १२ लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. काही लोक अद्याप बेपत्ता आहेत. ही इमारतीला आग सकाळी ३.१५ वाजता लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या सकाळी जवळपास ३.१५ वाजता घटनास्थळी पोहोचल्या'.

फॉरेन्सिक टीम आणि अग्निशमन दलाचे अधिकारी आग नेमकी कशी लागली, याचा तपास करत आहेत. तसेच इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करत आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर इमारतीत एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकही मदत कार्यासाठी धावले. परंतु आग आणि धुरामुळे लोकांना घरातून बाहेर काढणे अग्निशमन दलाच्या जवानांना आव्हानात्मक ठरत आहे. आग विझविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुर्घटनेतील मृतांचा एकूण आकडा स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Maharashtra News Live Update: : बीडच्या माजलगाव येथील लाहमेवाडी येथे टायर जाळत रस्ता रोको आंदोलन प्रशासनाचा निषेध

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT