Sharddha Saam TV
देश विदेश

Shraddha Walkar : 54 हजारांचा मोह नडला; क्रूरकर्मा आफताब पोलिसांच्या जाळ्यात असा अडकला

आफताबने श्रद्धाच्या खात्यातून त्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : वसईच्या श्रद्धा वालकरच्या हत्येने अख्खा देश हादरला आहे. पोलिस तपास जसा पुढे सरकतोय तसे अनेक खुलासे या प्रकरणाचे समोर येत आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा तपास पोलिसांना नेमका कसा केला, हा प्रश्न सर्वांसमोर आहे. आरोपी आफताब पुनावालाने काही केलेल्या चुका त्याला तुरुंगापर्यंत घेऊन गेल्या आहेत. ऑनलाइन ट्रान्जॅक्शन, श्रद्धाचा फोन बंद होणे, श्रद्धा हरवल्याची तक्रार दाखल होणे आणि आफताब पूनावालाने पोलिसांना दिलेला जबाब या सगळ्यांवरुन त्याच्या क्रूरकृत्याचा पर्दाफाश झाला. मात्र श्रद्धाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी सर्वात मोठी भूमिका श्रद्धाच्या खात्यातून आफताबच्या खात्यात 54 हजारांचा व्यवहाराची आहे. (Crime News)

आपण चहूबाजूने अडकलो आहोत हे कळल्यानंतर मात्र आफताबने अखेर तोंड उघडलं. आफताबने सांगितलेल्या घटनेने अवघा देश हादरला. त्यांना श्रद्धाची हत्या, त्यानंतर तिचे 35 तुकडे केले आणि त्यानंतर ते कसे जंगलात फेकले याचा सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. (Latest News Update)

श्रद्धाच्या खात्यातून आफताबच्या खात्यात 54 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. सुरुवातीच्या चौकशीत आफताबने पोलिसांना सांगितले की, श्रद्धा त्याच्याशी भांडण करून घरातून निघून गेली. त्यानंतर ती कुठे गेली, हे माहीत नाही. प्रश्न असा आहे की, जेव्हा श्रद्धा भांडणानंतर घरातून निघून गेली होती, तेव्हा तिने तिचे पैसे आफताबच्या खात्यात का ट्रान्सफर केले? म्हणजेच श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब ज्या पद्धतीने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट चालवत होता, त्याच पद्धतीने तो तिचे बँक खातेही वापरत होता. म्हणजे त्याला श्रद्धाचा पासवर्ड माहित होता. यामुळेच तो श्रद्धाच्या खात्यातून त्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकला.

पालघर पोलिसांनी श्रद्धा वालकरचे बालपणीचे मित्र लक्ष्मण नाडर आणि सुबिन यांचे जबाब नोंदवले. लक्ष्मणने पोलिसांना सांगितले की, श्रद्धा नेहमी त्याच्या संपर्कात होती, ती तिच्या सर्व गोष्टी त्याच्यासोबत शेअर करत असे. मात्र ती अचानक बेपत्ता झाल्याने त्याने श्रद्धाचे वडील विकास वालकर यांना याबाबत माहिती दिली. यानंतर श्रद्धाच्या वडिलांनी पोलिसांकडे श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

२६ ऑक्टोबर रोजी वसई पोलिसांनी प्रथमच आफताबचा जबाब नोंदवला. १४ मे रोजी श्रद्धा आणि आफताब मुंबईहून दिल्लीला आले आणि छत्तरपूरच्या घरी शिफ्ट झाले. आफताबने सांगितले की, २२ मे रोजी भांडण झाले आणि श्रद्धा तिचा फोन घेऊन निघून गेली. २६ मे रोजी श्रद्धाचा फोन बंद आला. मात्र २२ ते २६ मे दरम्यान श्रद्धाच्या खात्यातून आफताबच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले. फोनचे लोकेशनही छत्तरपूर असल्याचे सांगितले जात होते.

आता प्रश्न असा होता की, श्रद्धाने तिचा फोन घेतला होता, तर तिच्या फोनचे लोकेशन छत्तरपूर का दाखवले होते? श्रद्धाच्या खात्यातून आफताबच्या खात्यात 54 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले. 11 नोव्हेंबर रोजी वसई पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी आफताबची एकत्रित चौकशी केली असता आफताबला श्रद्धाचा पासवर्ड माहित असून तिने पैसे ट्रान्सफर केल्याचे सांगितले.

त्यानंतर वसई पोलीस आफताब राहत असलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर तेथील परिस्थिती पाहून त्यांचा आणखी संशय बळावला. आफताब पोलिसांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात होता.मात्र वसई पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्याने श्रद्धाला कसे मारले आणि नंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे कसे केले हे सांगितले. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाची कोणतीही भावना दिसत नव्हती असं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT