Sakshi Case Delhi ANI
देश विदेश

Sakshi Case Delhi: साक्षीसोबत भयानक कृत्य करणारा साहिल आहे तरी कोण?

Delhi Crime News: या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी साहिलला अटक केली.

Priya More

Delhi News: दिल्लीच्या शाहबाद डेअरी (Shahbad Dairy) येथे राहणाऱ्या 16 वर्षांच्या साक्षीची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आली. साक्षीची हत्या करणारा तिचा बॉयफ्रेंड साहिलला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. साहिलला दिल्ली पोलिसांनी बुलंदशहरातून अटक केली आहे. साक्षीने त्याच्यासोबत अचानक बोलणं बंद केल्यामुळे साहिलने तिची हत्या केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.

रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात साक्षीची हत्या करण्यात आली होती. साक्षी दिल्लीच्या ई-36 जेजे कॉलनीमध्ये कुटुंबीयांसोबत राहत होती. साक्षी रविवारी संध्याकाळी आपल्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला जाण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी साहिलने तिला रस्त्यामध्ये अडवले. दोघांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर साहिलने सोबत आणलेल्या चाकूने साक्षीवर सपासप वार केले. साहिलने साक्षीवर तब्बल 40 वार केले. साहिल ऐवढ्यावर थांबला नाही तर त्याने साक्षीच्या डोक्यावर सहा वेळा दगडाने वार केले.

पोलिसांनी सांगितले की, 'साक्षी आणि आरोपी साहिल दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र शनिवारी दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले. याचाच राग मनात ठेवून आरोपीने हे कांड केलं. साक्षीच्या हत्येनंतर आरोपी साहिलने घटनास्थळावरुन पळ काढला. शाहबाद पोलिसांनी आरोपी साहिलविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अवघ्या काही तासांत पोलिसांनी साहिलच्या मुसक्या आवळल्या आहेत. बुलंदशहरातून त्याला अटक केली.

पोलीस पीआरओ डीसीपी सुमन नलवा यांनी सांगितले की, आरोपी साहिल फ्रीज आणि एसी दुरुस्तीचे काम करतो. तपासादरम्यान आम्ही त्याची ओळख पटवली असून त्याला बुलंदशहरातून अटक करण्यात आली. आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी पोलीस या प्रकरणाबाबत सर्व पुरावे गोळा करत आहेत. मुलगा आणि मुलगी खूप पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. आरोपी साहिल 20 वर्षांचा आहे. साहिल आणि साक्षी हे ऐकमेकांना ओळखत होते. तसंच ते रिलेशनमध्ये देखील होते. साक्षी आणि साहिलचे शनिवारी भांडण झाले होते. त्यानंतर साक्षीने त्याच्यासोबत बोलणं बंद केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या साहिलने रागाच्या भरात तिची हत्या केली. या घटनेमुळे दिल्ली हादरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भेंडी खाल्ल्याने कोणते व्हिटॅमीन्स शरीराला मिळतात?

Maharashtra Rain Live News : नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Maharashtra Politics: शरद पवारांना आणखी एक धक्का, माजी आमदाराने सोडली साथ; अजित पवारांच्या पक्षात जाणार

11th admission deadline : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ, या तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

Shocking News : भयानक घटना! ५ वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला, मानेचे लचके तोडले

SCROLL FOR NEXT