Delhi Building Collapse saam tv
देश विदेश

राजधानीत थरारक घटना! 5 मजली इमारत कोसळली; 50 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली

Delhi Satya Niketan 5 Storey Building Collapse Latest News: दिल्लीतील चाणक्यपुरीच्या सत्य निकेतन परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 50 हून अधिक विद्यार्थी अडकल्याची शक्यता असून अग्निशमन दल आणि बचाव पथकांकडून मदतकार्य सुरू आहे.

Omkar Sonawane

राजधानी दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात येथील सत्य निकेतन भागात रविवारी 5 मजली इमारत कोसळल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जी इमारत कोसळली आहे, त्या इमारतीत मुलांचे हॉस्टेल असल्याने सांगितले जात आहे. या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्या खाली 50 पेक्षा जास्त मुल अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. बचाव पथकाकडून ढिगारा हटवून त्यामध्ये अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे. दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरू आहे.

घटनास्थळी स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने दाखल झाले असून बचाव पथकाला मदत करत आहेत. या ढिगाऱ्याखाली 50 हून अधिक विद्यार्थी अडकलेच्या सांगितले जात आहे. या दुर्घटनेवरून काँग्रेसने सरकारवर संताप व्यक्त केला आहे. NSUI ने ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, दिल्ली विद्यापीठाच्या साउथ कॅम्पसजवळील सत्य निकेतन परिसरात इमारत कोसळल्याची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. ढिगाऱ्याखाली दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी दबले असल्याची माहिती समोर येत आहे.

NSUI ने पुढे म्हटले, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. दिल्ली विद्यापीठ प्रशासन आणि सरकारने तातडीने युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करावे. प्रत्येक विद्यार्थी आणि नागरिकाला सुरक्षितपणे बाहेर काढावे. तसेच या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी व्यक्तींची जबाबदारी निश्चित करावी. विद्यार्थ्यांच्या जीविताबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही.

NSUI ने पुढे म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मोठमोठ्या व्यासपीठांवर जातात. मात्र, जेव्हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि जीविताचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा सरकार त्यांना विसरते. केंद्रात भाजपचे सरकार, दिल्लीत भाजपचे सरकार आणि MCD मध्ये भाजपचा महापौर. जर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सर्वकाही तुमच्या हातात आहे. तेव्हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? अखेर विद्यार्थ्यांना आपल्या जीवाची किंमत मोजून या निष्काळजीपणाचा फटका किती काळ सहन करावा लागणार? असा सवाल NSUI ने उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: नशीब चमकणार! या 3 राशींना मिळणार मोठी संधी; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : दुसरी स्त्री आवडूनही पुरुष तिच्याशी नात्याची कमिटमेंट का करत नाहीत? ‘ही’ 5 कारणं

Sunday Horoscope: मेष, सिंह, धनुसह या राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

Kelfulachi Bhaji : आहारात केळफुलाची भाजी का असावी? 'हे' ६ फायदे आताच घ्या जाणून

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT