Delhi Road Accident Saam Tv
देश विदेश

Delhi Road Accident: दुभाजकावर झोपलेल्या लोकांना ट्रकने चिरडले, चौघांचा मृत्यू

फरार ट्रकचालकाचा पोलिसांकडून शोध सुरु, गुन्हा दाखल

Shivani Tichkule

नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. सीमापुरी परिसरात दुभाजकावर झोपलेल्या सहा जणांना एक ट्रकने चिरडले. या भीषण अपघातात (Accident) चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीमापुरीतील डीटीसी डेपो रेडलाइटजवळ ही घटना घडल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. (Delhi Road Accident News)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली आहे. अशून करीम (५२), छोटे खान (२५), शाह आलम (३८), राहुल (४५) अशी अशी मृतांची नावे आहेत.तर मनीष आणि प्रदीप जखमी झालेल्या व्यक्तींची नवे आहे.

अपघात नेमका कसा झाला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमापुरी भागात रात्री १ वाजून ५१ मिनिटांच्या सुमारास काही लोक दुभाजकावर झोपलेले असताना भरधाव वेगात असणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांना चिरडलं. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी आहेत. दोघांचा घटनास्थळी तर तिसऱ्याचा रुग्णालयात जाताना आणि चौथ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात सामील असलेल्या ट्रकचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली असून योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

SCROLL FOR NEXT