Delhi Police’s 177-page affidavit reveals 2020 riots were a planned conspiracy aimed at toppling the government. saam tv
देश विदेश

Delhi Riots: 2020मधील हिंसा सुनियोजित कट; सत्ता बदलण्यासाठी घडवली दंगल; पोलिसांचा मोठा खुलासा

Delhi Riots 2020: दिल्ली पोलिसांनी १७७ पानांचे प्रतिज्ञापत्रात अनेक मोठे खुलासे केले आहेत. दिल्लीमधील हिंसा अचानक झाली नव्हती तर हा एक नियोजित प्लॅन होता, असा खुलासा पोलिसांनी केलाय.

Bharat Jadhav

दिल्लीमध्ये झालेल्या २०२० मधील दंगा प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. पोलिसांनी सुप्रीम कोर्टात एक १७७ पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात दिल्ली पोलिसांनी मोठा खुलासा केलाय.देशाच्या राजधानीत झालेला हिंसाचार हा अचानक उफाळून आला नव्हता, तर तो भारताच्या सार्वभौमत्वाला कमजोर करण्याच्या उद्देशाने आयोजित कट होता. तसेच दिल्लीचे सरकार उलथून टाकण्याचा एक कट होता, असं पोलिसांनी सांगितलंय.

विद्यार्थी नेते उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्यासह अनेक आरोपींनी जामीन अर्ज केलाय. त्याला उत्तर देण्यासाठी पोलिसांनी हा खुलासा केलाय. त्यासाठी हे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आले आहे, त्यात हा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय.

हिंसा घडवणं हा कट होता - पोलिसांचा खुलासा

दंगल ही जातीय धर्तीवर रचलेला कटाचा भाग होता. तपासकर्त्यांनी प्रत्यक्षदर्शी आणि तांत्रिक पुरावे एकत्रित करून हे सिद्ध केलंय. असं दिल्ली पोलिसांनी सांगितलंय. नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याविरुद्ध (सीएए) जनतेच्या असंतोषाला शस्त्र बनवण्यासाठी आणि भारताच्या सार्वभौमत्वावर आणि अखंडतेवर हल्ला करण्यासाठी हा कट आखण्यात आला होता,असे प्रतिज्ञापत्रात पोलिसांनी म्हटलंय.

ही संघटित आणि सुनियोजित हिंसा एक राष्ट्रव्यापी पॅटर्न होता. यात उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्येही हिंसा भडकली होती. दिल्लीत घडलेली हिंसा ही एक घटना नव्हती तर एक सुनियोजित कट होता. या कटातून सरकारला अस्थिर बनवण्याचा प्रयत्न होता. दरम्यान या प्रकरणातील आरोपींनी न्यायालयात जामीनसाठी अर्ज केलाय. त्याला दिल्ली पोलिसांनी कडाडून विरोध केलाय.

पोलिसांनी आरोपींना फटकारताना, त्यांच्यावर न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केल्याचा आणि कार्यवाही लांबवण्यासाठी समन्वित रणनीती अवलंबल्याचा आरोपही केलाय.या अशा वर्तनामुळे न्यायिक प्रक्रियेचा दुरुपयोग करणे आहे. या अशा कारणांमुळे न्याय मिळण्यास आणि न्यायिक प्रक्रिया पूर्ण होण्यात अडथळा निर्माण करत असते. फेब्रुवारी २०२० मध्ये तत्कालीन प्रस्तावित नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (CAA) झालेल्या हिंसेनंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि वकील रजत नायर आणि ध्रुव पांडे यांनी दिल्ली पोलिसांचे प्रतिनिधित्व केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT