Rs.2000 Restaurant Scheme Saam TV
देश विदेश

Rs.2000 Restaurant Scheme: आता हवं तेवढं खा...! २००० रुपयांत मिळतंय ३००० चं जेवण... रेस्टॉरंटचा पत्ता काय?

खवय्यांसाठी आणि २००० च्या नोटांच टेन्शन असलेल्यांसाठी आम्ही एक सुंदर अन् जबरदस्त हॉटेल शोधलं आहे.

Ruchika Jadhav

Delhi Restaurant Scheme: रेस्टॉरंटमध्ये अथवा बाहेर कुठेही जेवणासाठी गेल्यावर आपण देत असलेल्या पैशांत आणखीन थोडं जेवण मिळायला हवं होतं, असं अनेकांना वाटतं. अशा सर्वच खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा छापणे बंद केल्यावर आणि जवळ असलेल्या नोटा बँकत बदलून घेण्यास सांगितल्याने सर्वांचा गोंधळ उडाला आहे. आता या नोटेचा वापर करुन तुम्ही एक्सट्रा फूड खाऊ शकणार आहात. (Latets Marathi News)

अनेक नागरिकांनी आपल्या जवळ असलेल्या नोटा खर्च करण्यासाठी बाहेर काढल्या आहेत. मात्र बरेच दुकानदार २००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास तयार नाहीत. मात्र असे असले तरी खवय्यांसाठी आणि २००० च्या नोटांच टेन्शन असलेल्यांसाठी आम्ही एक सुंदर अन् जबरदस्त हॉटेल शोधलं आहे.

या हॉटेलमध्ये तुम्हाला फक्त २००० ची नोट द्यायची आहे. त्या बदल्यात तुम्हाला भरपूर असं म्हणजे ३००० रुपांच जेवण दिलं जाणार आहे. रेस्टॉरंटमध्ये असलेल्या या ऑफरमुळे सर्वत्र या १००० रुपयांच्या एक्सट्रा जेवणाची चर्चा रंगली आहे. ही स्कीम आणखी २ महिने चालणार आहे. ३१ जुलै ही शेवटची तारीख आहे.

अब दुविधा में भी सुविधा है

नवी दिल्लीमधील (New Delhi) कॅनॉट प्लेसमध्ये असलेल्या अडोर २.१ नावाच्या रेस्टॉरंटने ‘अब दुविधा में भी सुविधा है’ ही स्कीम सुरु केली आहे. या स्किमच्या नावाने देखील मोठी चर्चा होत आहे.

जर तुमचे कुटुंब मोठे असेल आणि तुम्ही २००० च्या ५ नोटा भरल्या तर तुम्हाला थेट मेंबरशीपचे एक कार्ड दिले जाईल. या कार्डमधून तुम्ही एका वर्षात २००००रुपयांच जेवण जेऊ शकता. हे कार्ड फक्त १००० व्यक्तींसाठीच मर्यादीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची शाळांची दयनीय अवस्था

Health Insurance: आता २४ तास अ‍ॅडमिड होण्याची गरज नाही; केवळ २ तास रूग्णालयात राहूनही मिळणार क्लेम

Maharashtra Politics : तुमचा मालक बाटगा, गळ्यात काँग्रेसचं मंगळसूत्र अन् टिळा शरद पवारांचा; रामदास कदमांचा ठाकरेंवर तिखट वार

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT