शनिवारी रात्री दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा जागीच मृत्यू झालाय. तसेच अनेक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आलीय. मृतकांमध्ये ९ महिला, ४ पुरूष आणि ५ मुले आहेत. यापैकी ९ जण बिहारमधील, ८ दिल्ली आणि एक हरियाणातील रहिवासी असल्याची माहिती समोर आलीय.
ही भयानक घटना रात्री १० वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ वर घडली. घटनेच्या वेळी, प्रयागराज महाकुंभ मेळ्यात जाण्यासाठी हजारो भाविक स्टेशनवर जमले होते. तसेच ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. महाकुंभ मेळ्यात जाणाऱ्या २ ट्रेन उशीरा आल्यामुळे आणि प्लॅटफॉर्म बदल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर स्टेशनवरील एका हमालानं स्टेशनवर नेमकं काय घडलं याची माहिती दिली.
आज तकच्या रिपोर्टनुसार, हमाल सुगन लाल मीना यांनी घटनेची माहिती दिली आहे. 'मी माझ्या साथीदारांसह १५ मृतदेह बाहेर काढले. नंतर मृतदेह रूग्णवाहिकेत ठेवले. मी १९८१ सालापासून हमाल म्हणून कार्यरत आहे. आजपर्यंत मी एवढी गर्दी कधीच पाहिली नव्हती. प्लॅटफॉर्म बदलण्यात आल्यामुळे, चेंगराचेंगरी झाली होती. लोक एकमेकांना तुडवत होते, असं हमाल म्हणाला.
'चेंगराचेंगरी झाल्यानंतर अनेक कुली त्या ठिकाणी पोहोचले. गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते. संपूर्ण प्लॅटफॉर्मवर बूट आणि कपडे विखुरलेले होते. त्यानंतर अग्निशमन विभागाला फोन केला. त्यानंतर ३-४ रूग्णवाहिका त्या ठिकाणी पोहोचल्या. त्यानंतर जखमींना रूग्णालयात नेण्यात आले'.
प्लॅटफॉर्म बदल्यामुळे चेंगराचेंगरी झाली
'रेल्वे प्रशासनाने अचानक ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलला. यामुळे तातडीने प्रवासी दुसर्या प्लॅटफॉर्मकडे पळू लागले. ज्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. प्रवासी एकमेकांना तुडवत ट्रेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. बरेच जण खाली पडले. हे सगळं पाहून मला अन्न खाण्याची इच्छा झाली नाही. माझे मन अस्वस्थ झाले होते', अशी प्रत्यक्षदर्शी हमालाने सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.