Sonam Wangchuk Health Saam Tv
देश विदेश

Delhi Protest: डील करायची असतीच तर २६ दिवस उपाशी राहिलो असतो का? सोनम वांगचुक संतापले

Sonam Wangchuk Health Update:

Priya More
  • २६ दिवसांचे उपोषण संपवल्यानंतर सोनम वांगचुक यांनी डीलच्या आरोपांवर संताप व्यक्त

  • डील करायची असती तर २६ दिवस उपाशी राहिलो असतो का?असा सवाल त्यांनी केला

  • सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले

  • त्यांच्या पत्नीने उपोषणामुळे त्यांचे ११ किलो वजन कमी झाल्याची माहिती दिली

नीट पेपर फुटीप्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. तब्बल २६ दिवसांनंतर त्यांनी उपोषण सोडलं. मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळाने भेट गेतल्यानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले होते. उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांच्यावर अनेक आरोप केले जात आहे. त्यांनी डील केली असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. या सगळ्या आरोपांनंतर कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली.

या व्हिडिओमध्ये त्यांनी उपोषण सोडल्यानंतर उपस्थित केल्या जात असलेल्या प्रश्नांवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री उपोषण सोडलं होतं. सोनम वांगचुक यांनी सरकारसोबत डील केल्याचा दावा केला जात आहे. सरकारसोबत डील करत त्यांनी उपोषण मागे घेतल्याचा आरोप करण्यात आला. शुक्रवारी रात्री सोनम वांगचुक यांनी या सततच्या आरोपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी आरोप करणाऱ्यांना थेट सवाल केला की,'२६ दिवसांच्या उपोषणानंतरही मला माझा प्रामाणिकपणा सिद्ध करावा लागणार आहे का?' जर मला सरकारसोबत डीलच करायची असती तर मी २६ दिवस उपाशी राहिलो असतो का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांचे उपोषण संपल्यानंतर एकीकडे काही जण त्यांचे कौतुक करत आहेत तर दुसरीकडे मोठ्या संख्येने नेटकरी त्यांच्यावर टीकाही करत आहेत. त्यांची बायको गीतांजली जे. आंगमो यांनी अलीकडेच यावर प्रतिक्रिया दिली. टीका करणाऱ्यांवर निशाणा साधत त्या म्हणाल्या, 'लोकांनी आपले राजकीय विश्लेषण थांबवून या आंदोलनासाठी वांगचुक यांनी मोजलेली वैयक्तिक किंमत लक्षात ठेवली पाहिजे.' गीतांजली यांनी इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये सांगितले की, सोनम वांगचुकने दीर्घकाळ चाललेल्या उपोषणामुळे ११ किलो वजन कमी झाले आहे. त्याला सध्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केडीएमसीत भाजप-शिंदेसेना-मनसेमध्ये शीतयुद्ध; नाव न घेता मनसेला इशारा, चर्चांना उधाण

भीमाशंकरमध्ये गर्दी व्यवस्थापनाचा फज्जा! एका बाजूला ट्रॅफिक जाम, दुसरीकडे पोलिस-भाविकांमध्ये हाणामारी

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दीत धावणार १५ डब्यांच्या लोकल, कर्जत-खोपोली, कसारा, बदलापूरच्या प्रवाशांना दिलासा

1 रुपयात अनलिमिटेड कॉल, रोज १ जीबी डेटा, १०० SMS; पण ही एक अट...BSNL ची जबरदस्त ऑफर

फार्म हाऊसवर सुरू होता भयंकर प्रकार; पोलिसांची धाड पडताच पळापळ, ८ महिलांसह २२ जणांना अटक

SCROLL FOR NEXT