Delhi Pollution Air quality AQI  SAAM TV
देश विदेश

Delhi Pollution : प्रदूषणानं दिल्लीचा श्वास कोंडला, उद्यापासून शाळा बंद; ५० टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

दिल्लीत प्रदूषणाची पातळी कमालीची वाढलीय. श्वास घेणेही दिल्लीकरांना कठीण झाले आहे.

Nandkumar Joshi

Delhi Pollution, Air quality : प्रदूषणासारख्या गंभीर समस्येमुळं दिल्ली सरकारनं खबरदारी म्हणून पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राजधानी दिल्लीत उद्या, शनिवारपासून प्राथमिक शाळा बंद राहणार आहेत. तर दिल्ली सरकारचे ५० टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम करणार आहेत. खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होमचा सल्ला देण्यात आला आहे.

दिल्ली सरकारने जीआरपीच्या अंतर्गत केंद्राच्या वायू गुणवत्ता समितीद्वारे शिफारस केलेले निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच दिल्ली सरकारने प्रदूषण रोखणाऱ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे. (Delhi News)

दिल्लीतील हॉट्सस्पॉट्सवर हवा प्रदूषणावर अंकुश ठेवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण मंत्र्यांनी दिली. राजधानी दिल्लीत खबरदारी म्हणून उद्यापासून सर्व प्राइमरी शाळा बंद राहतील. तर ५० टक्के सरकारी कर्मचारी घरून काम करतील. खासगी कार्यालयांनीही ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगावे, असा सल्ला सरकारने दिला आहे. (Pollution)

दिल्ली बनलंय गॅस चेंबर

दिवाळीनंतर प्रदूषणाच्या समस्येने बेजार झालेली दिल्ली आणि आजूबाजूच्या एनसीआर परिसरात दिवसेंदिवस श्वास घेणेही कठीण होऊ लागले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी वायू प्रदूषणाची पातळी भयंकर रुप धारण करत आहे. AQI पातळी दिल्ली आणि परिसरात ७५० हून अधिक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT