Delhi Crime News ANI
देश विदेश

Delhi Crime News: दिल्लीत पुन्हा श्रद्धा वालकरसारखं हत्याकांड?, तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे करुन उड्डाणपुलाखाली टाकले

Shraddha Walkar Death Case: या घटनेमुळे पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाची आठवण करुन दिली आहे.

Priya More

Delhi News: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीचे श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरण (Shraddha Walkar Murder Case) अजूनही कोणी विसरले नाही. तोवरच दिल्लीमध्ये पुन्हा एकदा अशाच हत्याकांडाची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये एका तरुणीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे करुन ते उड्डाणपुलाखाली टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या गीता कॉलनीतील उड्डाणपुलाजवळ (Geeta Colony Flyover) ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा दिल्ली हादरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील गीता कॉलनीतील उड्डाणपुलाजवळ बुधवारी सकाळी तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. फॉरेन्सिक टीम देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू करण्यात आली. घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून आसपास तरुणीच्या शरीराचे आणखी काही तुकडे आणि हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र मिळतेय की नाही याचा शोध सुरु आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास उड्डाणपुलाजवळ तरुणीच्या शरीराचे काही अवयव आढळून असल्याची माहिती मिळाली. अनेक ठिकाणी हे अवयव विखुरले होते. तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. जमुना खादर परिसरात दोन तुकडे केलेले मृतदेह सापडले आहेत. एफएसएल आणि गुन्हे पथक घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीचे जॉइंट सीपी परमादित्य यांनी सांगितले की, गीता कॉलनी उड्डाणपुलाखाली एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह 2 बॅगमध्ये आढळून आला आहे. एका पिशवीमध्ये डोके आणि दुसऱ्यामध्ये शरीराचे इतर अवयव आहेत. लांब केसांवरून हा मृतदेह तरुणीचा अथवा महिलेचा असल्याचे दिसते. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीमकडून तपास केला जात आहे.'

दरम्यान, मागच्या आठवड्यात दिल्ली पोलिसांना सफदरजंग हॉस्पिटलच्या मागील जंगलात कुजलेला मृतदेह सापडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता. हा मृतदेह महिलेचा आहे की पुरुषाचा हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day 2025 Live Update: मराठीसह इतर भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला- पीएम मोदी

Lenovo Tab: नवीन लेनोवो टॅब भारतात लाँच! दमदार फीचर्ससह १०,९९९ रुपयांपासून उपलब्ध

PM Narendra Modi : यापुढे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, सिंधू पाणी करारावरून पीएम मोदींनी पाकिस्तानला खडसावले

Kriti Sanon: क्रिती सेनॉनने खरेदी केला ७८ कोटींचा आलिशान पेंटहाऊस; जाणून घ्या किती आहे अभिनेत्रीची प्रॉपर्टी ?

Independence Day 2025: स्वातंत्रदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'भगवा लूक'; नेटकऱ्याचं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT