Delhi CM Arvind Kejriwal saam tv
देश विदेश

Delhi News: अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले दिल्ली पोलीस, याप्रकरणी दिली नोटीस

Arvind Kejriwal: दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले.

Satish Kengar

Arvind Kejriwal:

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. एका प्रकरणात नोटीस देण्यासाठी गुन्हे शाखेचे एसीपी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी केजरीवाल यांना क्राइम ब्रँचची टीम नोटीस देण्यासाठी आली असावी, असं सांगितलं जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केजरीवाल म्हणाले होते की, त्यांच्या सात आमदारांशी संपर्क साधण्यात आला आहे. 21 आमदारांना पक्षापासून फोडण्याची योजना आखण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यासोबतच दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी आम आदमी पक्षाच्या आमदारांना भाजप 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत असल्याचा आरोप केला होता.  (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

गेल्या महिन्यात 27 जानेवारी रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की, त्यांच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी दावा केला होता की, भाजपने आपच्या आमदारांना 25-25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे आणि त्यांना पक्षाचे तिकीट देण्याचे आमिषही दिले आहे.

ते म्हणाले होते की, ''मला कथित दारू घोटाळ्याच्या चौकशीसाठी बोलावून अटक करण्याची त्यांची योजना आहे. तसेच मला अटक झाल्यानंतर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्याचा कट ते रचत आहेत. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी आमचे सरकार पाडण्यासाठी अनेक कट रचले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. देव आणि लोकांनी आम्हाला नेहमीच साथ दिली. आमचे सर्व आमदारही भक्कमपणे एकत्र आहेत. यावेळीही हे लोक त्यांच्या हेतूंमध्ये फसतील.'' याच प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते, असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बलिप्रतिपदेच्या दिवशीची अनोखी परंपरा, गुराख्याच्या अंगावरून चालतो गायींचा कळप..

Rava Kheer Recipe: नवऱ्याचं तोंड करा गोड, घरीच बनवा रव्याची खीर

Mumbai Metro - 2B : मुहूर्त ठरला! 'मुंबई मेट्रो -२ ब' या दिवशी धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Bhudargar Fort History: कोल्हापूरातील ऐतिहासिक भुदरगड किल्ला माहितेय का? जाणून घ्या इतिहास आणि पर्यटकांसाठी टिप्स

लँडिंग होताना हेलिपॅड खचला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हेलिकॉप्टरला भयंकर अपघात; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT