Abhijeet Dipke News  AI Image
देश विदेश

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेच्या अडचणी वाढल्या, दिल्ली पोलिसांकडून अटक; तिहार कारागृहात पाठवले जाणार?

Abhijeet Dipke Arrested By Delhi Police: अभिजीत दिपकेला दिल्ली पोलिसांनी अटक केली. तर नेहा बोराला पोलिसांनी सोडून दिलं. आज दीपकेला कोर्टात हजर केले जाणार आहे.

Priya More
  • अभिजीत दीपकेला दिल्ली पोलिसांकडून अटक

  • अभिजीत दीपकेला आज कोर्टात हजर केले जाणार

  • अभिजीत दीपकेला तिहार कारागृहात पाठवण्यात येणार असल्याची शक्यता

  • अभिजीत दीपके यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणार

  • नेहा बोराची दिल्ली पोलिसांकडून सुटका

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिजीत दीपकेला दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या (बीएनएस) कलम १२६ आणि १७० अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. अटकेनंतर आज त्याला विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. तरऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोराला दिल्ली पोलिसांनी सोडून दिले. दिल्ली पोलिस कायद्याच्या कलम ६५ अंतर्गत औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नेहा बोराला सोडण्यात आले आहे.

अभिजीत दीपके आणि नेहा बोरा या दोघांना दिल्ली पोलिसांनी तिरंगा मार्चपूर्वी ताब्यात घेतले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ सीजेपीने शुक्रवारी दिल्लीमध्ये तिरंगा मार्च काढला होता. पण दिल्ली पोलिसांनी सेंट्रल पार्कवर तिरंगा फडकवण्यासाठी फक्त ११ जणांना परवानगी दिली होती. या मार्चसाठी निघण्यापूर्वीच पोलिसांनी अभिजीत दीपकेला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर नेहा बोराला ताब्यात घेण्यात आले होते.

अभिजीत दीपकेला आता दिल्ली पोलिसांनी अटक केली. या सर्व घडामोडीमुळे सीजेपी नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्याप्रमाणे अभिजीत दीपके यालाही तिहार तुरुंगात पाठवले जाईल का? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईनंतर रांका आणि दास या दोन्ही नेत्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना कोर्टाने ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अभिजीत दीपकेला अटक केल्यानंतर आज त्याला कोर्टासमोर हजर केले जाईल. कोर्ट काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांनी सोडल्यानंतर नेहा बोराने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, 'सर्व प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेची पायमल्ली केली जात आहे. सामान्य नागरिकांना जणू ते मोठे गुन्हेगार आहेत अशी वागणूक दिली जात आहे. ही प्रथा या देशात खूप काळापासून सुरू आहे. लोकांना कसे ताब्यात घेतले जात आहे हे सध्याच्या आंदोलनांनी स्पष्ट केले आहे. दिवस असो वा संध्याकाळ त्यांना रात्रभर ताब्यात ठेवले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळीच सोडले जाते.

तसंच, 'कोणत्या अधिकाराखाली याचे समर्थन केले जाऊ शकते? कोणत्या कायद्यानुसार किंवा सुव्यवस्थेनुसार लोकांना रात्रभर ताब्यात ठेवणे योग्य आहे? कायदेशीररित्या, लोकांना, विशेषतः महिलांना, सूर्यास्तानंतर सोडले पाहिजे, पण तसे होत नाहीये. इतकेच नाही तर अराजकता आणि गोंधळाचे एक नवीन चित्र पसरवले जात आहे.', असा आरोप नेहा बोराने केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन काम केल्याप्रकरणी FDA चे 6 अधिकारी वादाच्या भोवऱ्यात

Famous Actress Pregnant : ५२ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार! बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे PHOTO अन् VIDEO व्हायरल

Sugar Free Drink : शुगर फ्री ड्रिंक डायबिटीज रूग्णांसाठी हानिकारक की फायद्याचे?

Honey Tea : मधाच्या चहाचे ७ फायदे वाचून तुम्ही आजपासून प्यायला सुरुवात कराल, दूध-साखरेचा चहा विसराल

Rasgulla Recipe: गोड खायला आवडतं? मग घरच्या घरी बनवा रसाळ रसगुल्ले, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT