Delhi News Saamtv
देश विदेश

Delhi Rain News: क्षणात होत्याच नव्हतं झालं! पावसाच्या पाण्यातून वाट शोधताना विजेच्या खांबाला हात लागला अन्...

Delhi Rain Update: दिल्लीत (Delhi) शनिवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे.

Gangappa Pujari

Woman Died at New Delhi Railway Station: देशात सध्या मान्सून सक्रिय झाला असून काल विविध भागात पावसाच्या सरी बरसल्या. यावेळी अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अशातच राजधानी दिल्लीमधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. ज्यामध्ये विजेचा शॉक लागल्याने एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्लीत (Delhi) शनिवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. तरुणीने रेल्वे स्थानकबाहेर पावसामुळे साचलेल्या पाण्यात पाय टाकल्यानंतर विजेचा धक्का बसल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे...

साक्षी अहुजा नावाची ही तरुणी पूर्व दिल्लीमधील प्रीत विहारमध्ये वास्तव्यास होती. आज पहाटे 5.30 वाजता ती रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. यावेळी साचलेल्या पाण्यातू मार्ग काढत जात असताना तिने विजेच्या खांबाचा आधार घेतला. मात्र यावेळी विजेचा जोरदार धक्का बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ( Rain Update News)

या घटनेनंतर पीडितेची बहीण माधवी चोप्राने संबंधित अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा केल्याचा आरोप आरोप करत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT