Awadh Ojha Join Aam Adami Party Saam Tv
देश विदेश

Awadh Ojha: UPSC विद्यार्थ्यांच्या गुरूची 'आप'मध्ये एन्ट्री, विधानसभेचं तिकीट कन्फर्म?

Awadh Ojha Join Aam Adami Party: अवध ओझा यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश काले. ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Priya More

मोटिव्हेशनल स्पीकर आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचे गुरू अवध ओझा यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. अवध ओझा यांनी आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपमध्ये प्रवेश केला. अवध ओझा हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण त्यांनी याबाबत घोषणा केलेली नाही.

अवध ओझा हे उत्तर प्रदेशच्या गोंडा शहरातील रहिवासी आहेत. ते आपल्या शिकवण्याच्या खास पद्धतीसाठी प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर त्यांचे अनेक मोटिव्हेशनल व्हिडीओ आहेत. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर ते 'ओझा सर' म्हणून ओळखले जातात. दररोज ते आपल्या भाषण आणि वक्तव्यामुळे सोशल मीडियावर लोकप्रिय असतात. फेसबुक आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे स्वतःचे अकाऊंट नाही तरी देखील ते खूपच प्रसिद्ध आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपमध्ये प्रवेश केलेले अवध ओझा आगामी विधानसभा निवडणूक लढू शकतात. ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात हे अजून फायनल झाले नाही. न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे खूपच कौतुक केले होते. त्यांनी अरविंद केजरीवाल यांना राष्ट्रीय राजकारणातील माणूस असे म्हटले होते. केजरीवाल यांनी स्वत:सोबत इतर सहकाऱ्यांची काळजी घेतली असती तर आज चित्र वेगळे असते असे मत देखील त्यांनी व्यक्त केले होते.

अवध ओझा सर गेल्या अनेक वर्षांपासून यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. अनोख्या अंदाजमध्ये शिकवण्याच्या पद्धतीसाठी ते ओळखले जातात. त्यांची शिकवण्याची शैली विद्यार्थ्यांना प्रचंड आवडते. अवझ ओझा यांचे पूर्ण नाव अवध प्रताप ओझा आहे. ३ जुलै १९८४ साली उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील प्रसाद ओझा पोस्टमास्टर होते आणि त्यांची आई वकील होती.

अवध ओझा यांच्या वडिलांनी आपल्या पत्नीच्या शिक्षणासाठी ५ एकर शेती विकली होती. अवध ओझा यांनी आपले प्राथमिक शिक्षण गोंडा इथूनच पूर्ण केले होते. त्यांनी फातिमा इंटर स्कूलमधून १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. अवध ओझा यांना आईएएस बनायचे होते. त्यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी खूप सोपर्ट केला. त्यांनी दिल्लीमध्ये यूपीएससीची तयारी केली. त्यांनी प्रिलिम्स क्लियर केली पण मेन्स उत्तीर्ण करण्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी युपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरूवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT