Car breaches VIP gate and enters Delhi Assembly , raising serious security concerns. saam tv
देश विदेश

मोठी बातमी! व्हीआयपी गेटचे बॅरिकेट तोडत कार विधानसभेच्या आवारात घुसली अन्...

Car Entered Delhi Vidhan Sabha: एक भरधाव कार लोखंडी सुरक्षा गेट तोडून थेट विधानसभेच्या आवारात घुसली. विधानसभा अध्यक्षाच्या वाहनाजवळ काही कागदपत्र आढळली आहेत.

Bharat Jadhav

दिल्ली विधानसभेत सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली आहे. एक कार बॅरिकेट तोडून विधानसभेच्या आवारात घुसली. कार गेट क्रमांक २ मधून आत शिरली. दुपारी २ वाजता एक कार व्हीआयपी गेटचे बॅरियर तोडून थेट विधानसभेच्या आत घुसली. भरधाव थेट विधानसभा अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ व काही कागदपत्रे ठेवली. त्यानंतर ती कार त्याच गेटमधून बाहेर गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, कार उत्तर प्रदेश राज्याच्या नोंदणी क्रमांक असलेली आहे. भरधाव कारने लोखंडी गेट तोडून गेट क्रमांक २ मधून विधानशभेच्या आवारात घुसली, अशी माहिती विधानसभा कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या कार जवळ ठेवण्यात आलेली कागद कशाची होती, याची माहिती समोर आली नाहीये.

संसदेतील सुरक्षेतील त्रुटीचे एक पूर्वीचे प्रकरण उघडकीस आले होते. ही घटना १३ डिसेंबर २०२३ रोजी घडली आणि त्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला होता. ज्या दिवशी देश २००१ च्या संसद हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करत होता, त्याच दिवशी दिल्ली विधानसभेत भरधाव कार घुसल्याची घटना घडली.

लोकसभेच्या कामकाजादरम्यान सागर शर्मा आणि मनोरंजन डी नावाचे दोन तरुण अचानक प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात घुसले होते. ते थेट खासदारांच्या बाकांकडे धावू लागले. त्यांनी आपल्या बुटांमध्ये लपवलेले रंगीत धुराचे डबे बाहेर काढले, ज्यामुळे सभागृहात पिवळा धूर पसरला आणि गोंधळ निर्माण झाला होता.

सभागृहातील खासदारांनी हिम्मत दाखवत त्यांना पकडले, त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्याचवेळी, नीलम आणि अमोल शिंदे नावाचे आणखी दोन आंदोलक संसद परिसराबाहेर रंगीत धूर हवेत सोडत होते आणि घोषणाबाजी करत होते. ललित झा हा या संपूर्ण कटाचा सूत्रधार होता, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या आरोपींना बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांसारख्या मुद्द्यांवरून आंदोलन करायचे होते, तपासात उघड झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील राजभवन चौकात आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT