Delhi–Mumbai Expressway accident News : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भल्या पहाटे पिकअपचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये ३ जणांचा जिवंत जळून मृत्यू झालाय. अपघातानंतर पिकअपला आग लागली अन् जळून खाक झाले. बुधवारी पहाटे राजस्थानमधील अलवर येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर ही दुर्घटना घडली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जयपूरमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामधील मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर अलवर येथे झालेल्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काड घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी आणि पोलिसांनी बचावकार्य केले. जखमीला रूग्णालयात दाखल कऱण्यात आले. तर अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत केले. हा अपघात अतिशय भंयकर होता, पिकअपमधील व्यक्तींचा आरडाओरड अन् किंचाळ्याने परिसर हादरला होता, अशी प्रतिक्रिया स्थानकांनी दिली.
स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे दिल्लीहून जयपूरला जाणारा एक पिकअपची एका वाहनाशी जोरात धडक झाली. त्यानंतर काही सेकंदाच्या आतच पिकअपने पेट घेतला अन् आगीचा भडका उडाला. काही समजण्याच्या आत पिकअपमध्ये आग पसरली होती. आतमध्ये असलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. आतमधील ३ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेत पिकअप चालकही गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जयपूरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुर्घटना इतकी भयंकर होती की पिकअप जळून कोळसा झाली. आतमध्ये असणाऱ्या तीन जणांना बाहेर उतरण्याची संधीच मिळाली नाही. त्या तिघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्यांची अद्याप ओळख पटवलेली नाही. पिकअपचा पुढील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. त्यामुळे आतमध्ये असणाऱ्या तिघांना बाहेर येता आले नाही. अपघातानंतर काही सेकंदात आगीचा भडका उडाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.