Garment Factory Fire saam tv
देश विदेश

Garment Factory Fire: दिवाळीच्याच दिवशी गारमेंट फॅक्टरीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल

Delhi Fire Department: दिल्लीतील नजफगडच्या नांगली सकरावती येथील गारमेंट फॅक्टरीला रविवारी आग लागली. अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ७१ अग्निशमन केंद्रे, ५० क्विक रिस्पॉन्स गाड्या आणि २० बाईक सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

दिल्लीतील नजफगडच्या नांगली सकरावती भागातील एका गारमेंट फॅक्टरीला रविवारी संध्याकाळी आग लागली. आगीची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न करण्यात आले. सध्या घटनास्थळी आग विझवल्यानंतरची थंड करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दिल्ली अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी राजिंदर अटवाल यांनी याबाबत माहिती दिलीये.

दिवाळीसाठी अग्निशमन दलाची विशेष तयारी

दिवाळीच्या काळात दिल्लीतील सुरक्षेच्या तयारीबाबत बोलताना अग्निशमन अधिकारी राजिंदर अटवाल म्हणाले की, दरवर्षी दिवाळीच्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी अग्निशमन दलाकडून विशेष तयारी केली जाते.

सध्या दिल्लीत ७१ अग्निशमन केंद्रं सुरू आहेत. याशिवाय ५० क्विक रिस्पॉन्स गाड्या आणि २० फर्स्ट रिस्पॉन्डर बाईक्सही तैनात करण्यात आल्या आहेत.

त्याचप्रमाणे १५ ठिकाणी पाण्याचे टँकर सज्ज ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत येणाऱ्या फोनला प्रतिसाद देण्यासाठीही पूर्ण तयारी करण्यात आलीये. नागरिकांनी दिवाळी सुरक्षितपणे साजरी करावी, असं आवाहनही अग्निशमन अधिकाऱ्यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT