Delhi Liquor Scam Latest Update Ani
देश विदेश

Delhi Liquor Scam: निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही..; केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

Delhi Liquor Scam Latest Update: निवडणूक प्रचार सभा घेणं हे मूलभूत अधिकार नाहीये. जर त्यांना जामीन दिलं जाईल तर ते योग्य राहणार नाही. जामीन देण्याचा निर्णय नवीन पायंडा तयार करणारा असेल, असं ईडीने न्यायालयात म्हटलंय.

Bharat Jadhav

दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय. प्रचार सभा घेण्यासाठी केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यात यावे, या मागणीसाठी अर्ज करण्यात आलाय. दुसरीकडे ईडीने शपथपत्र दाखल केलं असून यात जामीन देऊ नये म्हटलंय.

निवडणूक प्रचार सभा घेणं हे मूलभूत अधिकार नाहीये. जर त्यांना जामीन दिलं जाईल तर ते योग्य राहणार नाही. जामीन देण्याचा निर्णय नवीन पायंडा तयार करणारा असेल, असं ईडीने न्यायालयात म्हटलंय.आतापर्यंत कोणत्याच राजकीय नेत्याला निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला नाहीये. ईडीने प्रतिज्ञापत्रात गेल्या ५ वर्षांत झालेल्या १२३ निवडणुकांचा तपशील दिलाय. यामध्ये कोणत्याही नेत्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला नसल्याचं म्हटलंय.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आज आपला निर्णय राखून ठेवला असून शुक्रवारी यावर निर्णय दिला जाणार आहे. ईडीने कथित दारू घोटळ्यात केजरीवाल यांना अटक केली असून आता केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडी शुक्रवारी ट्रायल कोर्टात त्याच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल करू शकते, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras Wishes : आली दिवाळी! मराठी, हिंदी आणि इंग्रजीत धनतेरसचे प्रियजनांना पाठवा खास मेसेज

Dhanteras 2026 : धनतेरसला पैसे उधार दिले तर घरात येते गरिबी? काय सांगते धार्मिक मान्यता?

ZP अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; घरात सापडलं अडीच किलो सोनं, 11 किलो चांदी

दिवाळीची मिठाई खाताना सावधगिरी बाळगा! मिठाईला चांदीचा वर्ख की अल्युमिनियम फॉईल?

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; NDA मधील मित्रपक्षाचा भाजपाला इशारा

SCROLL FOR NEXT