Arvind Kejriwal
Arvind Kejriwal  Yandex
देश विदेश

Arvind Kejriwal News: दिलासा नाहीच! अरविंद केजरीवाल यांना १ एप्रिलपर्यंत 'ईडी' कोठडी

Gangappa Pujari

Arvind Kejriwal Arrested:

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा देण्यास राउज एवेन्यू कोर्टाने नकार दिला आहे. आज अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. यावर सुनावणी पुर्ण झाल्यानंतर कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना १ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे केजरीवाल यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. आज त्यांची ईडी कोठडी संपणार असल्याने त्यांना पुन्हा दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टामध्ये हजर करण्यात आले. यावेळी सुनावणीनंतर कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना दिलासा देण्यास नकार दिला असून त्यांच्या ईडी कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

सुनावणीत काय घडलं?

सुनावणीवेळी ईडीकडून अरविंद केजरीवाल यांना आणखी सात दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. यावर केजरीवाल यांनी स्वतः न्यायालयात आपली बाजू मांडली. या संपूर्ण खटल्यात माझं नाव फक्त चार वेळा आले आहे. कोणत्याही कोर्टाने आतापर्यंत मला दोषी करार दिलेला नाही. तसेच माझे नाव घेणाऱ्याला ईडीने लगेच सोडून दिले, असा युक्तीवाद केजरीवाल यांनी केला.

तसेच या प्रकरणातील आरोपी अरविंद फार्मा याने 55 करोडचे इलेक्टोरल बॉण्ड्स विकत घेतले आहेत. आमच्याकडे बॉण्ड्सची कॉपी आहे. मी त्या कोर्टाला द्यायला तयार आहे, असा मोठा गौप्यस्फोटही अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केला. दरम्यान, सुनावणी पुर्ण झाल्यानंतर कोर्टाने केजरीवाल यांची ईडी कोठडी वाढल्याचे निर्देश दिले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO: KKRची दमदार कामगिरी; गंभीरच्या मार्गदर्शनाचं कौतुक करताना ढसाढसा रडला चाहता

Chhatrapati Sambhaji Nagar Election: ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार

Jasprit Bumrah Yoker: बुमराहच्या चेंडूनं हवेतच बदलली 'चाल'; गुल झालेली दांडी पाहून सुनीलला काही सुचेना VIDEO

Maharashtra Politics: लोकसभेच्या रणधुमाळीत विधानसभेची तयारी? नाशिक, दिंडोरीत सर्वपक्षीयांचा 'सोयीनं' प्रचार

Mahadev App Scam: महादेव ॲपचं श्रीलंका कनेक्शन, EOW ने 200 खात्यांमधील 3 कोटी रुपये गोठवले

SCROLL FOR NEXT