Married Woman Sindoor
Married Woman SindoorSaam TV

Court on Applying Kunku: कुंकू लावणं विवाहित महिलेचं धार्मिक कर्तव्य; आताच पतीकडे नांदायला जा, कोर्टाचे पत्नीला आदेश

Court on Married Woman Sindoor or Kumkum or Bindi: कुंकू लावणे विवाहित महिलेचं धार्मिक कर्तव्य असून ती लग्न झालेल्या महिलेची निशाणी आहे, असं निरीक्षण इंदूर कौटुंबिक न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना नोंदवलं.
Published on

Family Court Decision on Married Woman Sindoor Case

कुंकू लावणे विवाहित महिलेचं धार्मिक कर्तव्य असून ती लग्न झालेल्या महिलेची निशाणी आहे, असं निरीक्षण इंदूर कौटुंबिक न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना नोंदवलं. इतकंच नाही, तर न्यायालयाने महिलेला कुंकू लावून ताबडतोब पतीकडे जाण्याचे आदेश देखील दिले.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Married Woman Sindoor
Crime News: कोलकात्यामध्ये पत्नीची हत्या करून ८४ वर्षीय डॉक्टरने केला आत्महत्येचा प्रयत्न;धक्कादायक कारण आलं समोर

सुनावणीदरम्यान, कौटुंबिक न्यायालयाने (family court) आसामच्या गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला दिला. विवाहितेने कुंकू न लावणे ही क्रूरता ठरेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. इंदूर येथील एका व्यक्तीने वैवाहिक संबंध पूर्ववत करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने हा निकाल दिला आहे. याचिकाकर्त्याने दावा केला होता, की गेल्या ५ वर्षांपासून त्याची पत्नी कोणतेही कारण नसताना त्याच्यापासून विभक्त राहत आहे. आता तिने सिंदूर म्हणजेच कुंकूही लावणे बंद केले आहे.

दुसरीकडे, पती अंमली पदार्थांचे सेवन करून करून हुंड्यासाठी छळ करतो, असा आरोप विवाहित महिलेने केला होता. यावर इंदूर कौटुंबिक न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला.

विशेष बाब म्हणजे, जेव्हा महिला कोर्टात जबाब नोंदवण्यासाठी आली होती. त्यावेळी देखील तिने कुंकू लावले नव्हते. कोर्टाने तिला याबाबत विचारणा केली असता, तिने आपली चुकी मान्य केली. यानंतर कोर्टाने या प्रकरणाचा निकाल देत पत्नीला कुंकू लावून पतीकडे राहण्याचे आदेश दिले.

Married Woman Sindoor
Accident News: पिकनिक ठरली अखेरची; दोन जुळ्या बहिणींसोबत 4 जणांचा नदीत बुडून मृत्यू, मध्य प्रदेशमधील घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com