कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सूत्राकडून मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया, संजय सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल संध्या जामिनावर तिहारमधून बाहेर आले आहेत. मात्र आता दारू घोटाळा प्रकरणी आम आमदी पक्षावरच कारवाई होण्याची शक्यता आहे. आपवर चार्जशीट दाखल करण्याचं काम सुरू असल्याचं ईडीने म्हटलं आहे.
दरम्यान या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांनी ईडीने आपल्याला बेकायदेशीररित्या अटक केल्याचं म्हटलं आहे. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे.या प्रकरणातील पक्षकारांना लेखी म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाने एक आठवड्याचा वेळ दिला आहे. एका आठवड्यात ते सत्र न्यायालयात आपल म्हणणं मांडू शकतात, असं न्यायायलाने म्हटलं आहे.
दरम्यान आज झालेल्या सुनावणीवेळी ईडीने केजरीवाल आणि हवाला ऑपरेटर यांच्यातील चॅट chat सापडल्याचा दावा केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांचं संभाषण नष्ट केलं आहे, पण आम्हाला हवाला ऑपरेटर्सकडून हे chat उपलब्ध झालल्यांचा दावा ईडीने केला आहे.
केजरीवाल सरकारने दिल्लीत १७ नोव्हेंबर २०२१ रोजी महसूल धोरण लागू केलं होतं. या नव्या धोरणामुळे मद्यविक्री खासगी व्यापाऱ्याच्य हातात गेली. केजरीवाल सरकारने या धोरणामुळे माफिया राज संपेल आणि सरकारचा महसूल वाढेल असा दावा केला होता, मात्र हे नवं धोरण वादात सापडल्यामुळे जुलै २०२२ मध्ये रद्द हे धोरण रद्द करण्यात आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.