Sanjay Singh sent notice to ED SAAM TV
देश विदेश

Delhi Liquor Policy Case : खासदारानं ईडीलाच पाठवली नोटीस, नेमकं काय आहे प्रकरण?

Delhi Liquor Policy Case : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांनाच मानहानीची नोटीस पाठवली आहे.

Nandkumar Joshi

Delhi Liquor Policy Case : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांनाच मानहानीची नोटीस पाठवली आहे. ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा आणि कथित अबकारी घोटाळा प्रकरणात चौकशी करत असलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनाच ही नोटीस पाठवली आहे. ४८ तासांच्या आत माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहा, असे या नोटिशीत म्हटले आहे.  (Latest Marathi News)

ईडीच्या अधिकाऱ्यांनी आरोपपत्रात माझं नाव समाविष्ट केले आहे. कोणत्याही साक्षीदारानं माझं नाव घेतलेलं नाही. तरीही या प्रकरणात माझं नाव घेतलेले आहे. ईडी माझी बदनामी करण्यासाठी कट रचून माझं नाव घेत आहे असे दिसतेय. माझ्या विरोधात कोणीही साक्ष दिलेली नाही आणि माझ्या विरोधात कोणताही पुरावा नाही, असे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले.

मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा

दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार संजय सिंह यांनी सांगितले की, दिल्लीतील मद्य अबकारी धोरण कथित घोटाळा प्रकरणातील आरोपपत्रात खोटेपणाने माझे नाव नमूद केले आहे. यावरून मी ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे.

अरविंद केजरीवालांचाही हल्लाबोल

या प्रकरणात मागील शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ईडीवर टीका केली होती. ईडीकडून आपच्या नेत्यांना अडकवण्यासाठी त्रास देत आहे, तसेच त्यांना गोवण्यासाठी उतावीळ झाली आहे. आप नेते आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर दबाव टाकून खोटे जबाब घेतले जात आहेत, असा आरोपही केजरीवाल यांनी केला होता.

संजय सिंह प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले होते. ईडीने ज्या व्यक्तीच्या जबाबाच्या आधारे संजय सिंह यांचे नाव आरोपपत्रात नमूद केले आहे, त्या व्यक्तीने जबाबात अशी कोणतीही माहिती दिली नव्हती. ईडीने आरोपपत्रात वेगळाच उल्लेख केला आहे.

मनीष सिसोदिया यांनी फोन फोडल्याचा उल्लेखही ईडीने केला होता. पण तसं काहीही झालेले नाही. त्यांचे फोन ईडीच्या ताब्यात आहेत, असेही केजरीवाल म्हणाले. ईडीकडून चुकीचे पुरावे सादर करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liquor Price Hike : लोक रस्त्यावर दारु प्यायला बसतील, त्यामुळे...; उत्पादन शुल्कवाढीवर मद्यप्रेमींकडून मोठी भीती व्यक्त

Maharashtra Live News Update : पुण्यात लक्ष्मीबाई स्मृती पुरस्काराच आयोजन

Pratik Gandhi: हा अभिनेता घरोघरी जाऊन करायचा पाण्याच्या टाक्या साफ, जाणून घ्या या अभिनेत्याची गोष्ट

Ind Vs Eng : ४, ४, ६... मग पुढच्या ओव्हरमध्ये क्लीनबोल्ड, आकाश दीपने हॅरी ब्रूकच्या दांड्या उडवल्या; पाहा Viral Video

Crime: प्रोफेसरकडून शरीरसंबंधासाठी जबरदस्ती, विद्यार्थिनीने कॉलेजमध्येच पेटवून घेतलं; घटना CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT