DELHI PROTEST SHOCK: POLICE BRUTALITY ON WOMEN SPARKS OUTRAGE AT JANTAR MANTAR saam tv
देश विदेश

दिल्लीतील पोलिसांनी लाज आणली, जंतरमंतरवर खाकीतील रक्षक की भक्षक?

Delhi Police Brutality Women Protest Jantar Mantar: दिल्लीतल्या आंदोलनात रक्षकच भक्षक बनल्याचं चित्र साऱ्या देशानं पाहिलं...तरुणींसोबत असभ्य वर्तन करून पोलिसांनी खाकीची लक्तरं कशी वेशीला टांगली? तरुणींवर अमानुष लाठीचार्ज करून पोलिसांनी देशभर कशी लाज आणली? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.....

Suprim Maskar

राजधानी दिल्लीतील जंतरमंतर हे लोकशाहीतील विरोधाचा आणि मागण्यांचा आवाज उठवण्याचं मंच मानलं जातं. मात्र 20 जुलैला याचं जंतरमंतरवर जे काही घडलं, त्याने दिल्लीतल्या खाकी वर्दीच्या निर्दयी वागणुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या 'संसद चलो' मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलक महिला आणि विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीनं लाठ्या काठ्यांचा वापर केला, त्यानंतर आता एकच सवाल उपस्थित होत आहे खाकीतील हे पोलिस नेमके नागरिकांचे रक्षक आहेत की भक्षक?

हा व्हिडिओ नीट पाहा...आंदोलकांवर लाठ्या काठ्या चालवणारा हा नराधम पोलिस अधिकारी घाबरून पळ काढणाऱ्या या तरुणीला मागून दंडुक्यानं काय करतोय ते पाहा....

आता दुसऱ्या पोलिसांचा कारनामा पाहा...एका तरुणीला तिच्या पार्श्वभागावर काठी मारल्यानंतर हे दोन्ही पोलीस एकमेकांकडे पाहून अत्यंत अश्लाघ्य पद्धतीनं हसताना दिसतायत.

हे कमी की काय? म्हणूनच जंतरमंतरवर सत्ताधाऱ्यांच्या आदेशानं मस्तवालपणे फिरणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यानं ना आव पाहिला ना ताव एका आंदोलक तरुणीला थेट कानशिलात लगावली....माजोरड्या पोलिसांची आदोलकांना हाताळण्याची ही कोणती पद्धत आहे? दुसरीकडे तर काही मुजोर पोलीस अधिकाऱ्यांनी तर तरूणींना मारहाण करत त्यांचा मोबाईल हिसकावून नेला. मुळात आंदोलकांचा मोबाईल हिसकावण्याचा अधिकार या पोलिसांना दिला कुणी?

या सगळ्यात महिला आंदोलकांशी गैरवर्तन करणाऱ्या एका कॉन्स्टेबल आंदोलनकर्त्यांनी जाब विचारला... तेव्हा पोलिसांची बोलती बंद झाली.

इतकेच नव्हे तर भरपावसात आंदोलक मुलींना इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले.......

दरम्यान आम्हाला शांतपणे आंदोलन करायचे होतं, पण पोलिसांचे पूर्ण लक्ष आमचे कपडे फाडण्याकडेच होते, असा गंभीर आरोप एका पीडित तरुणीनं केलयं...

खासदार डिंपल यादव यांच्यासह आंदोलक तरुणींनीही पोलिस प्रशासनाच्या या क्रूरपणावर बोटं ठेवलयं....

दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी सर्व आरोप निर्लज्जपणे फेटाळून लावले आहेत.

न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर, विशेषतः अल्पवयीन मुलींवर असा अमानुष लाठीचार्ज करणे, त्यांची अंगावरील कपडे फाडण्यापर्यंत आणि अयोग्य स्पर्श करण्यापर्यंत पोलिसांची मजल जातेच कशी? सुरक्षेच्या नावाने जर रक्षकच भक्षक बनणार असतील, तर सामान्य जनतेने न्यायासाठी कोणाकडे पाहायचे? विशेष म्हणजे खालचे पोलीस कर्मचारी हा सगळा नंगानाच करत असताना आणि सारी उरली सुरली लाज सोडलेली असताना तिथे उभे असलेले आयपीएस अधिकारी काय करत होते? त्यामुळे आता केवळ शिक्षण मंत्र्यांचा राजीनाच नव्हे तर या सर्व निर्दयी आणि निर्लज्ज पोलिसांच्या अत्याचाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाचा काँग्रेसला दे धक्का! बड्या नेत्यानं सोडली पक्षाची साथ, शिवसेनेत घेतला प्रवेश

दिल्लीतील आंदोलनाचे देशभरात पडसाद, बिहारपासून केरळपर्यंत आंदोलनांचा भडका, प्रधानांच्या राजीनाम्यासाठी GEN Z रस्त्यावर

Maharashtra News Live Update: ठाकरे बंधूंचा 26 जुलैला संयुक्त मोर्चा

Thursday Horoscope : घरात वाद होतील, ५ राशींच्या व्यक्तींना कामात यश मिळेल; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Health Care : जांभई आल्यावर डोळ्यांतून पाणी का येते? जाणून घ्या ६ वैज्ञानिक कारणे

SCROLL FOR NEXT