Delhi CJP Jantar Mantar Protest Abhijeet Dipke News AI iamge
देश विदेश

शाळा, बँक, मेट्रो अन् दारूची दुकानंही बंद; राजधानीत नेमंक काय सुरू काय बंद?

Delhi CJP Protest Update News : दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मेट्रो स्थानके, रेल्वे सेवा, शाळा, बँका आणि इंटरनेट निर्बंधांबाबत जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट.

Alisha Khedekar

  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP आणि विरोधकांकडून आंदोलन

  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन

  • शाळा, बँक, इंटरनेट सेवा, ४५ मेट्रो स्टेशन बंद; रेल्वे रद्द

  • राजधानीत ४० हजारांहून अधिक जवान तैनात

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आज कॉकरोच जनता पार्टी आणि विरोधकांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात हे आंदोलन आहे. सीजेपीने आंदोलकांना सकाळी १० वाजता जंतर-मंतर येथे जमण्याचे आवाहन केले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आणि प्रशासनाने खबरदारीचे उपाय वाढवले आहेत. नवी दिल्ली परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बँक, शाळा, मद्यविक्रीची दुकाने, लांब पल्ल्याच्या रेल्वे, ४५ मेट्रो स्थानके आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आले आहे.

दिल्लीमध्ये २५ हजारांहून अधिक जवान तैनात

राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी २५ हजारांहून अधिक सुरक्षा जवान तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. नवी दिल्लीचे २० झोनमध्ये विभाजन करण्यात आले असून,अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. बस टर्मिनल, हॉटेल्स आणि इतर भागांमध्येही पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

४५ मेट्रो स्थानके बंद

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ९ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजल्यापासून १० ऑक्टोबरच्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ४५ मेट्रो स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली पोलिसांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला. संबंधित स्थानकांवरील इंटरचेंज सुविधा मात्र सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बँक आणि शाळांनाही सुट्टी जाहीर

दिल्लीत सुरु असलेल्या पार्श्वभूमीवर बँक आणि शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र शाळांना सुट्टी असली तरी ऑनलाईन शिकवणी घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच बँक बंद असल्या तरी त्याचा परिणाम ऑनलाईन बँकिंगवर होणार नाही असे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

इंटरनेट सेवांवर निर्बंध; रेल्वे प्रवाशांनाही फटका

सुरक्षेच्या कारणास्तव जनपथ-कर्तव्य पथ चौकाच्या आसपास चार किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट सेवा ९ ऑक्टोब रात्री १० वाजल्यापासून १० ऑक्टोबरच्या रात्री १० वाजेपर्यंत, म्हणजेच २४ तासांसाठी स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १० ऑक्टोबर रोजी सकाळी ४ ते दुपारी २ या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर येणाऱ्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमधील काही रेल्वे सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय, खबरदारीचा उपाय म्हणून १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आज दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांनी मेट्रो आणि रेल्वे सेवांचे ताजे वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"किती रेल्वे थांबवणार अन् किती रस्ते अडवणार?" CJP च्या आंदोलनावरून केंद्रीय मंत्र्याचा थेट सवाल; राजकारण तापलं

Maharashtra News Live Update: जंतर-मंतरवर सीजीपीचं आंदोलन, दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Cold Water : सकाळी उठताच थंड पाणी पिताय? सवय पडेल महागात, ५ गंभीर दुष्परिणाम वाचून हैराण व्हाल

भाजपला मोठा झटका! नागपूरमधील बड्या नेत्याचा थेट राजीनामा; पक्ष सोडताना सांगितले मोठे कारण

Diwali Holidays : दिवाळीच्या सुट्टीत मुलांना कसं ठेवाल व्यस्त? जाणून घ्या ६ भन्नाट उपाय

SCROLL FOR NEXT