PM Narendra Modi  Saam Tv
देश विदेश

Narendra Modi: PM मोदी यांची उमेदवारी रद्द करण्याबाबतची याचिका हायकोर्टाने फेटाळली, नेमकं प्रकरण काय?

Delhi High Court: पीएम नरेंद्र मोदी यांची उमेदवारी रद्द करण्याबाबत करण्यात आलेली याचिका दिल्ली हायकोर्टने फेटाळून लावली आहे. ही याचिका का दाखल करण्यात आली होती ते घ्या जाणून...

Priya More

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) गुरुवारी फेटाळून लावली. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सांगितले की, 'हे आरोप पूर्णपणे बेफिकीर आणि अप्रमाणित आहेत.'

पीएम मोदी यांना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लढवण्यास अपात्र ठरवण्यात यावे यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी कॅप्टन दिपक कुमार यांनी दाखल केलेली ही याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी सांगितले की, 'ही याचिका पूर्णपणे दुर्भावनापूर्ण आणि चुकीच्या हेतूने दाखल केली असल्याचे दिसते. त्यामुळे न्यायालय ही याचिका स्वीकार करत नाही.'

कॅप्टन दीपक कुमार यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, पीएम मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2018 मध्ये एअर इंडियाच्या विमानाचा प्राणघातक अपघात घडवून आण्याचा प्लॅन केला होता. त्यांचा हा प्लॅन एक प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा अस्थिर करण्याचा प्रयत्न होता. या विमानात दीपक कुमार कॅप्टन होते.

याचिका करताना दीपक म्हणाले की, 'नरेंद्र मोदींनी संविधानावर खोटी शपथ घेतली होती की, भारतीय राज्यघटनेवर त्यांचा खरा विश्वास आणि निष्ठा असेल.' याचिकाकर्त्याने मोदींच्या खोट्या शपथेची वेळीच चौकशी करण्याची मागणी केली होती. आरोप खरे ठरल्यास त्यांना पदावर राहण्यापासून रोखण्यात यावे.

उच्च न्यायालयाने निरीक्षण केले की, याचिकाकर्त्याने याचिकेत बेफिकीर आणि बिनबुडाचे आरोप केले आहेत. ज्याचा उद्देश कोणत्याही आधाराशिवाय निंदणीय आरोप करणे हा होता. ही आचिका तिरकस हेतूने कलंकित आहे. दरम्यान, या याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची देखील उमेदवारी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railway: रेल्वेचं RailOne अ‍ॅप लाँच! तिकीट बुकिंगपासून ते ट्रेन ट्रॅकिंग सर्वकाही एका क्लिकवर

Deepika Padukone: 'एवढ्या प्रेमाने भारताला प्रमोट केलं असतं...'; हिजाब परिधान केल्यामुळे दीपिका पदुकोण ट्रोल,नेमकं प्रकरण काय?

Mumbai Traffic : BKC मधील प्रवास महागणार! ५० मिनिटांत बाहेर न पडल्यास ‘कंजेशन फी’ आकारली जाणार

Mumbai: भारताच्या स्टार क्रिकेटपटूला अंडरवर्ल्डकडून धमकी, ५ कोटींच्या खंडणीची मागणी

Maharashtra Live News Update: महावितरणचे राज्यव्यापी संप सुरू

SCROLL FOR NEXT