Delhi High Court saam tv
देश विदेश

Delhi High Court : पत्नीकडून घरातल्या कामांची अपेक्षा ठेवणं म्हणजे क्रूरता नाही; हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

Husband Wife Divorce : पतीने आपली बाजू मांडताना म्हटलं की, मी आमचा संसार टिकवण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न केले. पत्नीला मोठ्या फॅमिलीत राहता येत नव्हतं. त्यामुळे मी वेगळं घर घेतलं.

Ruchika Jadhav

Delhi News :

पती-पत्नीच्या नात्यात अनेक कारणांवरून वाद-विवाद होत असतात. विविध कारणांमुळे जोडप्यांमध्ये घटस्फोट देखील होतो. अशात दिल्लीमध्ये एका महिलेने पती क्रूरतेने घरकाम करण्यास सांगतो यासाठी हायकोर्टात धाव घेतली. घटस्फोटासाठी तिने यावेळी याचिका दाखल केली. मात्र घरकाम करण्यास सांगितल्यास यात कोणतीही क्रूरता ठरत नाही, अशी विशेष टिप्पणी न्यायालयाने नोंदवली आहे.

न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बंसल कृष्णा यांच्या खंडपीठ यावर निकाल दिला आहे. पत्नीने विविध आरोप करत दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने पतीच्या बाजूने निर्णय दिलाय. पती आणि पत्नी विवाह करतात तेव्हा घराची त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. दोघांनी सर्व कामे वाटून करायची असतात.

लग्नानंतर घराचा आर्थिक भार पतीच्या खांद्यावर असतो. तर पत्नीला संपूर्ण घराकडे लक्ष द्यावे लागते. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे नोकरानीची वागणूक दिल्याच्या भावना नसाव्यात. आपले कर्तव्य समजून पत्नीने कामे केली पाहिजेत. यामध्ये कुठलाही कमीपणा बाळगू नये, असं कोर्टाने म्हटलं आहे.

पतीने आपली बाजू मांडताना म्हटलं की, मी आमचा संसार टिकवण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न केले. पत्नीला मोठ्या फॅमिलीत राहता येत नव्हतं. त्यामुळे मी वेगळं घर घेतलं. मात्र तरीही ती माझ्यापासून दूर गेली. साल २००७ मध्ये आम्हाला एक बाळ झालं. ती बाळाला घेऊन तिच्या आई-वडिलांच्या घरी राहतेय. त्यामुळे महिलेने केलेल्या क्रूरतेमुळे कोर्टाने पतीला पत्नीपासून घटस्फोट दिला आहे.

पत्नीने आपली कर्तव्य पूर्ण करणे गरजेचं आहे. मात्र आपल्या कर्तव्यांपासून पत्नीने पळ काढला. तसेच पतीला आपल्या मुलापासून देखील दूर केले. पत्नीला घरात घरकाम करण्यास सांगणे म्हणजे क्रूरता नाही, अशी टिप्पाणी कोर्टाने या प्रकरणात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महावितरणचे राज्यव्यापी संप सुरू

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

Navapur : आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू; नवापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

म्हाडाची बंपर ऑफर! मुंबईतील प्राईम लोकेशनवरील घरांची थेट विक्री, घरे भाड्यानं देण्यासही तयार

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् व्याजातून कमवा लाखो रुपये

SCROLL FOR NEXT