Video Viral : कोरियन स्किन व्हावी म्हणून फेसमास्क लावलं अन् तरुणीचे आयब्रो निघाले; पाहा VIDEO

Charcoal Mask Removing Girl Video : सुंदर दिसावं म्हणून या तरुणीने संपूर्ण चारकोल फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर अप्लाय केलं. त्यानंतर ते पूर्ण सुकवून घेतलं. चेहरा आणि हातावर देखील तिने हे मास्क लावलं होतं.
Video Viral
Video ViralSaam TV
Published On

Girls Viral Video :

सुंदर दिसण्यासाठी तरुणी नेहमीच विविध सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. मात्र यातील अनेक प्रोडक्ट चेहऱ्याला सूट होत नाहीत. ज्यामुळे सुंदर दिसण्याऐवजी काही मुली कुरूप दिसू लागतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये या तरुणीची हालत पाहून तुम्हालाही हसू येईल.

Video Viral
Viral Video: 'हा निव्वळ मूर्खपणा..',भटक्या कुत्र्यांना घेऊन जाणाऱ्या गाडीतून तरुणाने सोडलं मोकाट; पहा VIDEO

सध्या मार्केटमध्ये चारकोलचे प्रोडक्ट आले आहेत. चारकोल फेसवॉश, चारकोल कोलगेट यासह चारकोल फेसमास्क देखील बाजारात उपलब्ध आहे. आता सुंदर दिसावं म्हणून या तरुणीने संपूर्ण चारकोल फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर अप्लाय केलं. त्यानंतर ते पूर्ण सुकवून घेतलं. चेहरा आणि हातावर देखील तिने हे मास्क लावलं होतं.

मास्क पूर्ण सुकल्यावर तिने ते काढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तिची स्किन पूर्णतः सुकून गेली होती. चेहरा सुकल्याने मास्क काढताना तिला फार त्रास होत होता. कोणीतरी आपल्याला जोरात खेचत आहे, आपली स्किन फाटेल अशा पद्धतीच्या वेदना तिला होत होत्या. चेहऱ्याचा फेस मास्क काढताना तिने हनुवटी आणि गालावरील फेसपॅक आधी काढून घेतले.

तरुणीने अगदी आयब्रोला देखील फेसपॅक लावला होता. त्यामुळे तिला मास्क काढताना आयब्रो निघतात की काय अशी भीती होती. जास्त दुखत असल्याने तिने नंतर हाताला लावलेला फेसपॅक हटवला. नंतर आयब्रोवरील फेसपॅक काढताना यामध्ये तिचे आयब्रो देखील निघून गेले, असं या तरुणीने व्हिडिओमध्ये म्हटल आहे.

@missumanty या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकरी देखील यावर विविध कमेंट करत आहेत. तरुणीला कोरियन व्यक्तीसारखी स्किन हवी होती. त्यामुळे तिने हा हॅक वापरला असंही तिने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

Video Viral
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंच्या समोर मराठा तरुणांची घोषणाबाजी; धाराशिवमध्ये काय घडलं? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com