Delhi government 16 IAS officers transfer full list 2026 saam tv
देश विदेश

१६ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Delhi Government 16 IAS Officers Transfer Full List 2026: दिल्ली सरकारने 16 IAS आणि DANICS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करत मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. कोणाला कोणती जबाबदारी देण्यात आली, जाणून घ्या सविस्तर माहिती.

Omkar Sonawane

दिल्ली सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठा फेरबदल करत अनेक IAS आणि DANICS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सरकारने 7 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या प्रसिद्धपत्रकानुसार एकूण 16 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून बाहेरून आलेल्या काही अधिकाऱ्यांना विविध विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. हा बदल तात्काळ लागू करण्यात आला आहे.

कोणाची कुठे नियुक्ती?

AGMUT कॅडरचे 2003 बॅचचे आयएएस अधिकारी विवेक पांडे यांची दिल्ली सरकारमध्ये बदली झाल्यानंतर शहरी विकास विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर 2004 बॅचच्या आयएएस अधिकारी गरिमा गुप्ता यांना प्रशासकीय सुधार विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 2005 बॅचचे आयएएस विजय कुमार बिधूडी यांच्या कार्यभारात बदल करण्यात आला असून ते आता पर्यावरण आणि वन विभागाचे सचिव तसेच दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती (DPCC) चे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. त्याच बॅचमधील अमजद तक यांची दिल्ली सरकारमध्ये नियुक्ती करून त्यांना वित्त विभागाचे सचिव करण्यात आले आहे.

2009 बॅचचे अजय कुमार गुप्ता यांना अन्न सुरक्षा आयुक्त पदासोबतच गृह विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. 2010 बॅचच्या आरती लाल शर्मा यांची सिंचन आणि पूर नियंत्रण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 2013 बॅचचे जितेंद्र कुमार जैन यांना अन्न व नागरी पुरवठा विभागाचे विशेष आयुक्त बनविण्यात आले आहे. तसेच अवनीश कुमार यांना उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे संचालक पद देण्यात आले आहे.

अंकिता आनंद यांची शिक्षण संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीनंतर त्याच बॅचच्या वेदिता रेड्डी यांना महिला व बालविकास विभागाच्या विशेष सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दिलखुश मीणा यांची दिल्ली शहरी आश्रय सुधार मंडळ (DUSIB) सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. अजहरुद्दीन जहीरुद्दीन आणि स्वेता नगरकोटी यांना महानगरपालिका उपायुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच DANICS अधिकारी राज कुमार यांची सामान्य प्रशासन विभागाच्या विशेष सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जतिन गोयल यांना शिक्षण विभागात अतिरिक्त संचालक पद देण्यात आले असून निधी सरोही यांना परिवहन विभागाच्या संयुक्त आयुक्तपदी पूर्णवेळ जबाबदारी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning sneezing: सकाळी उठल्यावर अचानक शिंका येतायत? या 3 गंभीर समस्या असू शकतात

Maharashtra News Live Update: चांदोली-वारणा धरण 100 टक्के भरलं, सांगली-कोल्हापूरची पाण्याची चिंता मिटली

Refined oil alternatives: रिफाइंड तेल धोकादायक! हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात हे 5 प्रकारचे तेल

High Blood Pressure : हाय बीपी काही मिनिटांत होईल कमी, फक्त करा 'हे' छोटं काम

आयुष्यभर पंढरीची वारी करणाऱ्या १५ ज्येष्ठांच्या पायी नतमस्तक! कामशेतमध्ये रंगला भक्तीमय सोहळा

SCROLL FOR NEXT