G20 Summit News Update Saam Tv
देश विदेश

G20 Summit: आता G20 होऊ शकतो G21, आफ्रिकन युनियन बनणार समूहाचा स्थायी सदस्य, PM मोदींच्या प्रस्तावाला मंजुरी

G20 Summit News Update: आता G20 होऊ शकतो G21, आफ्रिकन युनियन बनणार समूहाचा स्थायी सदस्य, PM मोदींच्या प्रस्तावाला मंजुरी

Satish Kengar

G20 Summit Delhi 2023:

दिल्लीच्या प्रगती मैदानात भारत मंडपम येथे आज G20 शिखर परिषदला सुरुवात झाली आहे. यावेळी उपस्थित सर्व परदेशी पाहुण्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वागत केले. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी शिखर परिषदेचे उद्घाटन केले आणि G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा स्थायी सदस्य म्हणून समावेश करण्याची घोषणा केली.

पंतप्रधान मोदींच्या या घोषणेला सर्वांनी सहमती दर्शवली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष अझाली असौमानी यांना इतर G20 नेत्यांसह त्यांच्यासोबत येण्याचे निमंत्रण दिले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुमच्या सर्वांच्या संमतीने मी पुढील कार्यवाही सुरू करण्यापूर्वी, मी आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांना G-20 चे स्थायी सदस्य म्हणून त्यांचे स्थान घेण्यास आमंत्रित करतो."  (Latest Marathi News)

पंतप्रधान मोदी यांनी G20 मध्ये आफ्रिकन युनियनच्या समावेशासाठी प्रस्ताव ठेवला होता. जूनमध्ये त्यांनी संपूर्ण खंडाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आफ्रिकन युनियनचा समावेश करण्याच्या भारताच्या प्रस्तावाचा विस्तार करणाऱ्या नेत्यांना पत्र लिहिले होते.

त्याचवेळी जुलैमध्ये कर्नाटकातील हंपी येथे झालेल्या तिसऱ्या G-20 शेर्पा बैठकीदरम्यान शिखर परिषदेसाठीच्या मसुद्यात औपचारिक प्रस्तावाचा समावेश करण्यात आला होता. भारतासाठी हा एक राजनैतिक विजय देखील आहे, कारण यामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याला चालना मिळेल. तसेच आफ्रिकन युनियनच्या समावेशामुळे सदस्य देशांना चीन-समर्थित बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हद्वारे (BRI) उभ्या असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayush Shinde: 24 षटकार, 43 चौकार! आयुषची Harris Shield मध्ये रेकॉर्डब्रेक खेळी; सचिनला सोडलं मागे

Maharashtra News Live Updates: निवडणूक कर्मचारी मतपेट्या घेऊन मतदान केंद्रावर रवाना, पोलिसांचा चोख बंदोबस्त

Gulaabi Movie: श्रृती मराठेच्या चित्रपटाची 'गुलाबी' हवा; रिलीज होण्याआधीच कोट्यावधी रूपये कमावले

Viral Video: मुजोरी! भक्ताला सुरक्षारक्षकांची मारहाण, मंदिरातील संतापजनक व्हिडीओ व्हायरल

Mohammed Shami: अखेर शमीला संघात स्थान मिळालं! या दिवशी उतरणार मैदानात

SCROLL FOR NEXT