Delhi Farmer Protest Saam TV
देश विदेश

Farmers Protest : दिल्लीच्या सीमेवर प्रचंड तणाव; शेतकरी-पोलिसांमध्ये रात्रभर धुमश्चक्री

Delhi Farmers Protest : दिल्लीच्या तिन्ही सीमा सील करण्यात आल्या आहेत. वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्तेमार्ग बंद केल्याने मिळेत त्या रस्त्याने शेतकरी दिल्लीत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रविण वाकचौरे

Farmer Protest :

शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहे. पंजाब-हरियाणाचे हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीत जाण्यावर शेतकरी ठाम आहेत. मात्र शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ द्यायचं नाही, असा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी पोलिसांचा फौजफाटा दिल्लीच्या सीमांवर तैनात करण्यात आला आहे. रात्रभर पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री पाहायला मिळाली.

दिल्लीच्या तिन्ही सीमा सील करण्यात आल्या आहेत. वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्तेमार्ग बंद केल्याने मिळेत त्या रस्त्याने शेतकरी दिल्लीत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. काल हरियाणा-पंजाबला जोडणाऱ्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, बॅरिकेड्सही तोडले. (Latest Marathi News)

पोलिसांनी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी ड्रोनमधून अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. यादरम्यान 100 हून अधिक शेतकरी आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांना ताब्यातही घेतले आहे. रात्रभर हा गोंधळ सुरूच होता. शेतकरी पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहिले, त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी रात्री देखील अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंटरनेट सेवा बंद

शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा गोंधळ पाहता हरियाणा सरकारने १५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू केले आहे. तसेच इंटरनेट सेवा देखील १५ फेब्रुवारीपर्यंत बंद केली आहे. हरियाणा, दिल्लीची सिंघू-टिकरी सीमा आणि उत्तर प्रदेशची गाझीपूर सीमा सील करण्यात आली आहे. दिल्लीत पुढील ३० दिवस कलम १४४ लागू राहणार आहे. पंजाबमध्येही इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.

बस सेवेवरही परिणाम

हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने (HRTC) दिल्लीला येणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत. हिमाचलहून दिल्लीला येणाऱ्या सर्व बसचे मार्ग चंदीगडपर्यंत मर्यादित करण्यात आले आहेत. हरियाणाच्या बसेसना आधीच प्रवेश बंदी आहे. शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली ते नोएडा आणि नोएडा ते दिल्ली प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avoid Coffee Benefits: 15 दिवस कॉफी बंद केल्याने शरीरात काय बदल होतात?

Period Cramps Remedies : पीरियड्समधील वेदना शून्य मिनिटांत होतील कमी; 'हे' ५ आयुर्वेदिक उपाय ठरतील फायदेशीर

Manohar Mama Bhosale : भोंदू मनोहरच्या वाढदिवसाला होती चक्क ९० आमदारांची उपस्थिती; अलिशान हॉटेलमध्ये भरायचा दरबार, धक्कादायक माहिती उघड

Maharashtra News Live Update: लातूर जिल्ह्यातील 1 हजार 450 कृषी सेवा केंद्र चालकांचा आजपासून बेमुदत बंदमध्ये सहभाग

Blood Pressure: ही छोटी चूक ठरते BPसाठी घातक! पाणी कमी पिणाऱ्यांनी आत्ताच व्हा सावध, नाहीतर...

SCROLL FOR NEXT