PM Narendra Modi : भारताला २०४७ सालापर्यंत विकसित राष्ट्र करण्याचं लक्ष्य; पंतप्रधान मोदी UAE मध्ये काय म्हणाले?

PM Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका हिंदू मंदिराला जमीन देण्याबद्दल यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचे आभार मानले. तसेच भारताला २०४७ सालापर्यंत विकसित करण्याचं लक्ष्य आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले
PM Narendra Modi
PM Narendra Modi ANI
Published On

Narendra Modi Latest News :

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय यूएईच्या अबुधाबीच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यादरम्यान 'अहलान मोदी' कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात यूएईमधील भारतीय वंशांच्या नागरिकांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका हिंदू मंदिराला जमीन देण्याबद्दल यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचे आभार मानले. तसेच भारताला २०४७ सालापर्यंत विकसित करण्याचं लक्ष्य आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सांगितले. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे

१. अबूधाबी राहणाऱ्या व्यक्तींनी इतिहास रचला आहे. तुम्ही कानाकोऱ्यातून आला आहात. तुम्ही देशातील विविध राज्यातून आला आहात.

२. भारत आणि यूएईची दोस्ती झिंदाबाद. मी कुटुंबातील सदस्यांना भेटायला आलो आहे.

३. मी आपल्या भारताच्या मातीत जन्माला आलो आहे. त्या मातीचा सुगंध घेऊन आलो आहे. मी भारतातील १४० कोटी लोकांचा संदेश घेऊन आलो आहे. तुमचा भारताला अभिमान आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Narendra Modi
Political Explainer: लोकसभा लढवण्याऐवजी सोनिया गांधी राज्यसभेच्या 'सेफ मोड'मध्ये का गेल्या? काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

४. तुम्ही वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. एक चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार. मी विमानतळावर आलो, तेव्हा राष्ट्रध्यक्ष त्यांच्या पाच भावांसोबत आले.

५. मी पहिल्यांदा येथे आलो. तेव्हा जवळच्या घरी आलो, असं वाटलं. माझा सत्कार म्हणजे १४० कोटी भारतीयांचा स्वागत झालं. यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीयांचंही स्वागत झालं.

PM Narendra Modi
Explainer: MSP म्हणजे नक्की काय? शेतकरी का आहेत भूमिकेवर ठाम? कायदा झाला तर फायदा होणार का? जाणून घ्या

६. गेल्या १० वर्षात यूएईमध्ये माझा ७ वा दौरा आहे. भाई शेख मोहम्मद बिन जायद आज देखील विमानतळावर घेण्यासाठी आले होते. मला आनंद वाटतोय की, आम्हालाही चार वेळा स्वागत करण्याची संधी मिळाली आहे.

७. माझी शेख यांच्याशी भेट होते. तेव्हा ते भारतीय लोकांचं भरपूर कौतुक करतात. कोव्हिड काळातही यूएईमधील भारतीय वंशांच्या लोकांबद्दल निश्चिंत होतो.

८. मित्रांनो, २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचं लक्ष्य आहे. देशातील अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com